म्हसावद l प्रतिनिधी
विद्या गौरव प्रायमरी व गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कूल व गौरव आर्ट्स कॉमर्स व सायन्स कनिष्ठ महाविद्यालय आमलाड ता.तळोदा यांच्या संयुकत विद्यमाने 1 मे रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य किरण वळवी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ललित पाठक व विश्वास पवार हे होते. कार्यक्रमाची सुरुवात भारत माता व छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले त्यानंतर ध्वज स्तंभाचे पूजन प्रमुख पाहुन्याच्या हस्ते करण्यात आले.ध्वजारोहण ललित पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे शिक्षक निलेश ढोढरे व क्रीड़ा शिक्षक पुलायन जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन किरण वळवी यांनी केले
या यावेळी प्रभारी प्राचार्य किरण वळवी, ललित पाठक सर यांनी महाराष्ट्र दिना बाबत आपले विचार मांडून विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.या वेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शेवटी आभार शिक्षिका आरती यादव यांनी मानले.










