नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील पातोंडा शिवारात अतिउष्माघाताने एका 35 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.याबाबत ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदूरबार तालुक्यातील पातोंडा शिवारात संतोष मुकुटलाल शहा यांच्या शेतातील बांधावर 35 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला. रंग काळा, अंगात तपकीरी व पांढरे पट्टे असलेला चौकडीचा फुल बाहीचा शर्ट, फुल पॅन्ट, दाढी वाढलेली, काळे केस असे वर्णन त्या इसमाचे आहे, अतिउष्माघाताने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या बाबत राकेश तुकाराम पटेल यांनी पोलिस ठाण्यात खबर वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.वरील वर्णनाचा इसमाचा नातेवाईकांनी शोध घेण्याचे आवाहन उपनगर पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील येळवे यांनी केले आहे.








