नंदूरबार l प्रतिनिधी
खांडबारा- नंदुरबार रस्त्यावर अल्टो कार व दुचाकीचा भीषण अपघातात दोन पुरुष व एक महिला असे तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.30 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे.अपघात इतका भीषण होता की अपघात होताच दुचाकीला आग लागून दुचाकी जळून खाक झाली.
मिळालेली प्राथमिक माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील खडकी हून बजाज कंपनीची (एम.एच.39, ऐ.एच.9150) मोटरसायकल वर परविन बकाराम सूर्यवंशी (वय 22) हा मुलगा व त्याची आई सविता बकाराम सूर्यवंशी सोबत नंदुरबार येथे दवाखान्याचा कामासाठी जात असताना भादवड गावानजीक समोरून येणारी अल्टो कार (क्र. एम. एच.39, 6107) ने समोरून धडक दिल्याने सविता बकाराम सूर्यवंशी,परविन बकाराम सूर्यवंशी रा. खडकी, ता. नवापूर
व दिनेश विनायक पाटील रा. नंदुरबार हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.अपघात इतका भीषण होता की अपघात होताच दुचाकीला आग लागून दुचाकी वाहन जळून खाक झाली. दिनेश विनायक पाटील या व्यक्तीच्या डोक्यावर व हाता पायाला गंभीर दुखापत झाली आहे.अपघात होतात घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत घटनास्थळी मदत केली व रुग्णवाहिकेला पाचारण करून तिघा जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी खांडबारा पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार विश्वास गावित, अमलदार सुरेश चौरे, प्रवीण अहिरे यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य केले. अपघातस्थळी वाहतूकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी जेसीबीचे मदतीने वाहनांना रस्त्याच्या कडेला करून वाहतूक कोंडी सुरळीत केली.








