नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील सोनपाडा येथे चुकीने फोन लागल्याच्या कारणावरुन एकास काठीने मारहाण केल्याने चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील सोनपाडा येथील नेहम्या दामू पाडवी यांच्याकडून अनावधानाने मोहनदास कृष्णा वळवी यांना फोन लागला. या कारणावरुन नेहम्या पाडवी यांना मोहनदास कृष्णा वळवी, प्रकाश कृष्णा वळवी, अशोक कृष्णा वळवी व प्रेम मोहनदास वळवी यांनी काठीने मारहाण करुन दुखापत केली. याबाबत नेहम्या पाडवी यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ४५२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.प्रशांत पाटील करीत आहेत.








