Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीशी विवाह केल्यास दोन वर्षे पर्यंत सक्षम कारावास व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा, सहकार्याचे प्रशासनाचे आवाहन

team by team
April 29, 2022
in क्राईम
0
अल्पवयीन मुलीशी विवाह केल्यास दोन वर्षे पर्यंत सक्षम कारावास व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा, सहकार्याचे प्रशासनाचे आवाहन

नंदूरबार l प्रतिनिधी
अक्षय तृतीयेच्या दिवशी भारतातील काही भागात मोठ्या प्रमाणावर विवाह आयोजित केले जातात. यावेळी बालविवाह सुद्धा होण्याची शक्यता असते. नंदूरबार जिल्ह्यातही यादिवशी बालविवाह होणार नाही, यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले आहे.
बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात लागू करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात बालविवाह होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पोलीस विभाग, बालकल्याण समिती, बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्राम बाल संरक्षण समिती, तालुका बाल संरक्षण समिती, जिल्हा बाल संरक्षण समिती, चाईल्ड लाईन, ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक, पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका इत्यादी यंत्रणेची मदत घेण्यात येईल. बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 च्या कलम 9 नुसार प्रौढ पुरुषाने अल्पवयीन मुलीशी विवाह केल्यास दोन वर्षे पर्यंत सक्षम कारावास व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. कलम दहा नुसार बाल विवाह जुळवून आणणे किंवा जबरदस्तीने बालविवाह लावण्यास प्रवृत्त करणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. कलम 11 नुसार बालविवाहास प्रोत्साहन देणाऱ्या किंवा बालविवाहास परवानगी देणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत, होत असल्यास याविषयी नागरिकांनी प्रशासनास सूचित करावे. असे आवाहन श्री. वंगारी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी: निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांची सूचना

Next Post

तिलाली ग्रामपंचायत सरपंचपदी स्मिता मधुकर पाटील यांची निवड

Next Post
तिलाली ग्रामपंचायत सरपंचपदी स्मिता मधुकर पाटील यांची निवड

तिलाली ग्रामपंचायत सरपंचपदी स्मिता मधुकर पाटील यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add