नवापूर l प्रतिनिधी
नवापूर पिंपळनेर रस्त्यावरील पंचमुखी हनुमान मंदिर वळण रस्त्यावर मोटर सायकल घसरल्याने प्रवाशी गंभीर जखमी झाला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी 12 वाजेच्या सुमारास( क्र.एम.एच.41, BD5997) यावरील मोटरसायकल स्वार डांगसौदाने नाशिक हुन सुरत कडे जाण्यासाठी मोटरसायकल वरून जात असताना अचानक वळण रस्त्यावर गाडी स्लिप झाल्याने रस्त्याचे पलीकडे फेकले गेले स्थानिक नागरिकांनी नवापूर येथील सेवाभावी सामाजिक कार्यकर्ता लाजरस गावित यांना माहिती देऊन जीवनधारा एबुलन्सच्या माध्यमातून गंभीर जख्मि झालेल्या व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते प्राथमिक उपचारा नंतर फॅक्चर असल्या कारणाने त्यांना नंदुरबार जिल्हारुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जखमी असलेल्या व्यक्ती च्या आधारकार्ड वरून ओळखपटली असून अबरार नजीर शेख असे नाव असून नाशिक जिल्ह्यातील डांगसौदाने येथील रहिवासी असल्याचे कळते अपघाताची माहिती मिळताच नवापूर पोलीस घटना स्थळी धावून आले असून पुढील तपास करत आहेत.
या बाबद नवापूर पोलिस स्टेशन येथे कळविण्यात आले मात्र या प्रकरनी कोणतीही नोंद उशा पर्यत न होती.