Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा तालुका प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने सेवा पुस्तक शिबिर आयोजित

team by team
April 28, 2022
in शैक्षणिक
0
शहादा तालुका प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने सेवा पुस्तक शिबिर आयोजित

नंदुरबार l प्रतिनिधी
शासकिय कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक म्हणजे त्याच्या सेवेचा आरसा असतो. अशा सेवापुस्तकामध्ये वेळोवेळी नोंदी करणे आवश्यक असते. जर सेवापुस्तकात नोंदी केलेल्या नसतील तर पदोन्नती सेवानिवृत्ती अथवा यासारखे लाभ घेताना अडचणी येवू शकतात. या मागणीसाठी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा तालुका प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष तुकाराम अलट यांच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू ,जि.प.नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी डॉ.यूनुस पठाण, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, गटशिक्षणाधिकारी डी.टी.वळवी यांना निवेदन देण्यात आले होते.या निवेदनाची दखल घेऊन सेवापुस्तक शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्यामुळे वाडी, वस्ती,पाड्यावरील शिक्षक बंधू-भगिनी यांनी प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व प्रशासनाचे आभार मानले आहेत.
शहादा तालुकाध्यक्ष तुकाराम अलट यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सेवापुस्तक हे कर्मचारी यांच्या सेवेचा अत्यंत महत्वाचा अभिलेख आहे. हा अभिलेख ‘अ’ वर्गात मोडत असल्याने तो प्रदिर्घ कालावधी पर्यंत जतन करून ठेवणे व सुस्थितीत ठेवणे ही त्या संबंधित कार्यालयाची जबाबदारी आहे. सेवापुस्तक अपूर्ण असेल काही आक्षेप असतील तर संबंधित कर्मचारी यांना निवृत्तीनंतरचे देय लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होतात, तरी सेवापुस्तकास आक्षेपच लागू नयेत या करीता सेवा पुस्तक आवश्यक असणार्या नोंदी खालील बाबींची पूर्तता कर्मचारी सेवेत कार्यरत असतांनाच करुन घेण्याची कार्यवाही कार्यालय प्रमुख/ आहरण व संवितरण अधिकारी यांनी करणे आवश्यक आहे. सेवापुस्तक अद्ययावत ठेवण्याच्या दृष्टीने सेवापुस्तकात सर्विस बुक खालील बाबांच्या नोंदी असणे आवश्यक आहेत.
अ) प्रथम नियुक्तीचा तपशिल : शासकीय सेवेत प्रथम नियुक्तीचा दिनांक
२. कार्यालयाचे नाव व पदनाम
३.प्रथम नियुक्तीच्या आदेशाची प्रत
४. वैद्यकीय तपासणी अहवालाची नोंद वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र सेवापुस्तकास जोडलेले असावे
६. चारित्र्य पडताळणीची नोंद
७. प्रथम पृष्ठावरील जन्मतारीख/ पडताळणी केली आहे काय ?
८. जात पडताळणी प्रमाणपत्राची नोंद
९. स्वग्राम जाहीर केल्याची नोंद
१०. सेवेत कायम करण्यात आल्याची नोंद
११. परोविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्याची नोंद
१२. विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद
१३. विवाहानंतरच्या नांव बदलाबाबतची नोंद
१४. संगणक परीक्षा उत्तीर्ण (एमएससीआयटी व इतर)
१५, संगणक चाचणी परीक्षा उत्तीर्ण
१६. मराठी भाषा परीक्षा सूट देणेबाबतचा आदेश
१७. हिंदी भाषा परीक्षा सूट देणेबाबतचा आदेश
१८. प्रथम पानावरील प्रत्येक पाच वर्षांनी प्रमाणित केली आहे का ?
१९. पाठीमागील पानावरील सेवा प्रमाणित आहे काय? वयाच्या ५०/५५ व्या वर्षा पलीकडे / अर्हताकारी सेवेच्या ३० वर्षानंतर शासकीय अधिकारी नोंदी ठेवणे.२०.कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकन केल्याबाबतची नोंद
वयाच्या ५०/५५ व्या वर्षा पलीकडे / अर्हताकारी सेवेच्या ३० वर्षानंतर शासकीय अधिकारी/
कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकन करून मुदत पूर्व सेवानिवृत्त केले असल्यास त्याबाबतची नोंद
२२. सेवाअंतर्गत प्रशिक्षण नोंद
२३. वार्षिक वेतनवाढ मंजुरी नंतर रकाना क्रमांक ८ मध्ये कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी २४. मानीव दिनांक नोंद
२५. मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील क्र. ८९२८/२०१५ दिनांक ०६/०७/२०१७ रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत रुजू झालेल्या व जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याच्या सूचना शासन निर्णय दिनांक २१/१२/२०१९ व ०५/१०/२०२० च्या अंमलबजावणी बाबतची नोंद.
अशाप्रकारे शासकिय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तकामध्ये आवश्यक असणाऱ्या वरील नोंदी करणे गरजेचे असते. आपण जर वरील प्रमाणे नोंदी केलेल्या नसतील तर त्या करून घ्याव्यात व त्यावर सक्षण अधिकाऱ्याची सही व शिक्का घ्यावा. यासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग येथील ईशी नाना, धनगर नाना,गिरासे नाना यांचे सहकार्य लाभले आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने शिक्षक बंधू भगिनी उपस्थित राहुन नोंदी पुर्ण करण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी वीजबिल भरणा केंद्रे सुरू

Next Post

वाण्याविहीर येथे स्वच्छतागृह व वर्गखोल्यांचा उद्घाटन व लोकार्पण

Next Post
वाण्याविहीर येथे स्वच्छतागृह व वर्गखोल्यांचा उद्घाटन व लोकार्पण

वाण्याविहीर येथे स्वच्छतागृह व वर्गखोल्यांचा उद्घाटन व लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add