खापर l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे मुख्य रस्त्यावर तारा लोंबकत होत्या. त्या तारांना स्पर्श होऊन कापसाने भरलेला ट्रक मध्ये आग लागली होती. सुदैवाने गावकऱ्यांनी वेळेत आग विझवली होती पण यात ट्रक मालकाचे हजारोंचे नुकसान झाले होते. झालेल्या घटनेची बातमी प्रसिद्ध केली होती.सदर प्रकरणाची महावितरणाला जाणीव झाली. आणि लोंबकत्या तारांची उंची वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांना तात्काळ पाठवण्यात आले होते. महावितरणाने तारांची उंची वाढवल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.