नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा येथील महिलेची चैन स्नॅचिंगसह , घरफोडी , चोरी करणारा अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली असून, 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीमती मंगलाबाई राजाराम चौधरी रा- ठाणेदार गल्ली तळोदा ता- तळोदा हे दि. 26 फेब्रुवारी रोजी सांय 7 वाजेच्या सुमारास तळोदा गावात बडोदा बॅक समोरुन मारुती मंदीराकडे पायी जात असतांना मोटार सायकलवरील दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील 40 हजार रुपये किमतीची दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र जबरीने खेचुन नेले याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपीतांविरुध्द् भादंवि क 392 , 34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांची दोन पथके तयार केली . तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला योग्य ते मार्गदर्शन करुन तात्काळ कारवाई करुन गुन्हेगारांना बेड्या ठोकण्याचे आदेशीत केले . वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी गुन्ह्याचा तपास करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके तयार केली . गुप्त बातमीदारामार्फत जेलमधुन सुटुन आलेले , पॅरोल रजेवर आलेले चैन स्नॅचिंगचे जबरीने चोरी करणारे नंदुरबार जिल्ह्यातील व आजु बाजुच्या जिल्ह्यातील गुन्हेगारांची माहिती घेण्यास सुरुवात केली . नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , अक्कलकुवा तालुक्यातील बिजरीगव्हाण येथील सराईत गुन्हेगार खोजल्या तडवी हा दिड ते दोन वर्षानंतर जळगांव येथुन चोरीच्या गुन्ह्यामधून जेलमधुन सुटुन बाहेर आलेला आहे व इतर जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या मदतीने चैन स्नॅचिंगसारखे गुन्हे करु शकतो . त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मार्गदर्शन व सुचना केल्या . त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या राहत्या गांवी जाऊन शोध घेतला परंतु संशयीत आरोपी तेथे मिळुन आला नाही . बिजरीगव्हाण येथील सराईत गुन्हेगार खोजल्या तडवी हा नंदुरबार शहराच्या बाहेरच कुठे तरी शेतात त्याची आई व भावासोबत राहतो अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्याच्या राहत्या गावी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या नंदुरबार शहराच्या बाहेर असणाच्या संपुर्ण परीसरात त्याचा शोध घेतला परंतु तो मिळुन येत नव्हता . दि 26 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमंलदार नंदुरबार शहरात गस्त करीत असतांना नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , नंदुरबार शहरात भोणे फाटा भागात दोन इसम कमी किमतीत मोटर सायकल विकत आहेत अशी बातमी मिळाल्याने . सदरची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सांगितली . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे 2 पथके तयार केली . तसेच त्याबाबत पथकांना योग्य ते नियोजन करुन सापळा लावण्याचे ठरविले व पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ भोणे फाटा परीसरात जावून खात्री केली असता एका पान टपरी जवळ दोन इसम एका विना नंबर प्लेट असलेल्या मोटार सायकलसह दिसून आले . स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्याकडे जात असतांना त्यांना पोलीस आल्याची चाहूल लागताच दोन्ही संशवीत इसमांनी मोटार सायकल तेथेच सोडून पळून गेले . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयीत इसमास पाठलाग करुन ताब्यात घेतले व दुसरा इसम पळून जाण्यात यशस्वी झाला . ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाला त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव खोजल्या वण्या तडवी रा . बिजरीगव्हाण ता . अक्कलकुवा ह . मु . तळोदा कणकेश्वर मंदिर असे सांगितले . त्यास त्याच्याजवळ असलेल्या मोटर सायकल बाबत विचारपुस करता तो उडवा – उडवीची उत्तरे देवु लागला . म्हणून त्यास स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय नंदुरबार येथे आणुन त्यास विश्वासात घेवून अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की , सदरची युनिकॉर्न मोटर सायकल ही त्याने व त्याचा चुलत भाऊ सुग्या सन्या तडवी अशांनी काही महिण्यापुर्वी गुजरात राज्यातून चोरुन आणली आहे . बाबत सांगितल्याने 50 हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटार सायकल व इतर 7 महागड्या मोटार सायकली हस्तगत करण्यात यश आले होते . जप्त करण्यात आलेली युनिकॉर्न मोटार सायकल व तळोदा येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची मोटार सायकल एकाच वर्णनाची दिसत असल्याने त्यास पोलीसांनी विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने व त्याचा चुलत भाऊ सुग्या सन्या तडवी अशांनी मिळून दोन ते अडीच महिण्यापुर्वी तळोदा शहरात मारुती मंदिरालगत असलेल्या रोडवर दोन स्त्रीया पायी पायी जात असतांना एका महिलेच्या गळयातील मंगळसुत्र जबरीने खेचून चोरुन नेले होते . त्यात जबरीने चोरुन नेलेल्या सोन्याच्या मंगळसुत्राबाबत विचारपुस केली असता त्याने ते मंगळसुत्र काढून दिले . सदर मंगळसुत्राची पाहणी केली असता ते दिड तोळे वजनाचे 75 हजार रुपये किमंतीचे असल्याचे आढळून आले ते मंगळसूत्र कायदेशीर संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून हस्तगत करण्यात आले आहे .
ताब्यात घेण्यात आलेल्या खोजल्या तडवी यास अधीक विश्वासात घेऊन विचारपुस केली असता 20 ते 25 दिवसापुर्वी त्याने व त्याचा चुलत भाऊ सुग्या सन्या तडवी अशांनी मिळुन प्रत्येकी एक – एक असे दोन AC दोन वेळा चोरुन नेले होते त्याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असलयाचे निष्पन्न झाले . चोरी केलेला एक AC त्याची आई राहत असलेल्या नंदुरबार शिवारातील शेतातील झोपडीतुन 10 हजार रुपये किमंतीचा एक AC हस्तगत करण्यात आलेला आहे. संशयित आरोपी खोजल्या तडवी याने तीन चार महिण्यापुर्वी त्याचा चुलत भाऊ नामे सुग्या सन्या तडवी अशांनी तळोदा शहरात रात्रीच्या वेळेस बसस्थानक जवळ असलेले किराणा दुकानाचे कुलुप तोडुन तेलाचे बॉक्स , तांदुळाच्या गोण्या व इतर किराणा सामान चोरुन नेला होता त्याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदरचे किराणा त्याने व त्याचा चुलत भाऊ सुग्या सन्या तडवी अशांनी वापरल्याचे सांगितल्याने ते हस्तगत करता आले नाही . सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , प्रभारी पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , सहा . पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी , पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे , पोलीस नाईक सुनिल पाडवी , विशाल नागरे , बापू बागुल , रमेश साळुंखे यांच्या पथकाने केली आहे .