नंदुरबार l प्रतिनिधी
ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन व इंडियन ऍडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच एस.ए.मिशन हायस्कूल येथे घेण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट कराटे परीक्षेत नवापुर येथील वनिता हायस्कूलच्या कराटे प्रशिक्षिका श्रीमती ज्योती चौधरी व शिरपूर येथील आर.सि.पटेल हायस्कूलच्या कराटे प्रशिक्षिका रेश्मा बाळू मराठे या दोघी महिलांनी ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश संपादन केले. त्यांच्या यशस्वी कामगिरी बद्दल जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी निर्भया महिलांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गेल्या चार ते पाच वर्षापासून अतिशय मेहनतीने मार्शल आर्टस्चा मुख्य खेळ म्हणून जगभरात ओळखला जाणारा कराटे या खेळाचे कला कौशल्य आत्मसात करून शेवटी नवापुर येथील वनिता हायस्कूलच्या कराटे प्रशिक्षिका श्रीमती ज्योती चौधरी व शिरपूर येथील आर.सि.पटेल हायस्कूलच्या कराटे प्रशिक्षिका रेश्मा बाळू मराठे या दोघी महिलांनी ब्लॅक बेल्ट डिग्री संपादन केली. नंदुरबार जिल्ह्यातील दोन्ही महिलांना ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मराठे, सचिव गणेश मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शैलेन्द्र चौधरी, गणेश वडनेरे आदी उपस्थित होते.








