अक्कलकुवा ! प्रतिनिधी
अक्कलकुवा ग्रामपंचायतीमध्ये चोरी झाल्याची घटना दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी समोर आली असून ग्रामपंचायतीचे दप्तर तसेच नुकतेच बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच नवीन कंप्यूटर यांची चोरी झाली असल्याचे बोलले जात असून या ग्रामपंचायतीत झालेल्या कथित भ्रष्टाचार ची चौकशी सुरू असतानाच ती अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली असतानाच या ग्रामपंचायतीचे दप्तर चोरीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आले असून यातील चोरट्यांचा तपास लावणे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा ग्रामपंचायतीमध्ये दि. 3 ऑगस्ट रोजी रात्री चोरी झाल्याचा प्रकार दि.4 ऑगस्ट रोजी सकाळी उघड झाला असून ग्रामपंचायत कार्यालयातून ग्रामपंचायतीच्या दप्तराची तसेच ग्रामपंचायती मध्ये नुकत्याच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची, कंप्यूटर व सहित्यांची चोरी झाल्याची माहिती पोलिस ठाण्याला सरपंच राजेश्वरी वळवी व प्रभारी ग्रामसेवक मनोज पाडवी यांनी दिली.पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या ग्रामपंचायतीत चोरी झाली आहे. ग्रामपंचायतीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी अंतिम टप्प्यावर आली असताना या ग्रामपंचायतीतून ग्रामपंचायतीचे दप्तर चोरीला गेल्यामुळे शहरांमध्ये एकच चर्चा रंगली असून या चोरीचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
सदर यावेळी पोलिस प्रशासन संध्याकाळी घटना स्थळी हजर झाले. तसेच स्वानपथक ही हजर झाले. सदर पोलिस प्रशासन या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी करित आहे.