नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील लहान सुरवाणी जि.प.शाळेचा स्टोअर रुमच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने शाळेतील सुमारे ३६ हजार रुपयांचे साहित्य चोरुन नेले.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील लहान सुरवाणी येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. सदर शाळेच्या स्टोअर रुमच्या दरवाचा कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. स्टोअर रुममधील असलेले २ हजार रुपये किंमतीचे ईन्व्हर्टर बॅटरी, २० हजार रुपये किंमतीचे दोन सोलर बॅटरी, ४ हजार रुपये किंमतीचे १ सोलर ईन्व्हर्टर, १ हजार रुपये किंमतीचे गॅस सिलेंडर, ४ हजार २०० रुपये किंमतीचे ३०० किलो तांदुळ, ९०० रुपये किंमतीचे १० किलो मटकी, २ हजार ४०० रुपये किंमतीची ३० किलो तूरदाळ, १ हजार ८०० रुपये किंमतीचे २४० किलो चवळी, ६४० रुपये किंमतीचे दोन किलो ग्रॅम व १ किलो हळद असे एकूण ३७ हजाराचे साहित्य लंपास केले. याबाबत मुख्याध्यापक सुनिल विश्राम साळवे यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.स्वप्निल गोसावी करीत आहेत.








