Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘महा आवास अभियान २०२०-२१’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर, सर्वात जास्त मंजूर घरकुले पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यात नंदूरबार राज्यात दुसरा

team by team
April 28, 2022
in राज्य
0
‘महा आवास अभियान २०२०-२१’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर, सर्वात जास्त मंजूर घरकुले पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यात नंदूरबार राज्यात दुसरा

मुंबई l प्रतिनिधी
महा आवास अभियान 2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा प्रथम ठरला असून धुळे दुसऱ्या आणि ठाणे जिल्हा तृतीय क्रमांकांवर सर्वोत्कृष्ट ठरला आहे. त्याचबरोबर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर, रत्नागिरी जिल्हा द्वितीय आणि वर्धा जिल्हा तृतीय क्रमांकावर सर्वोत्कृष्ट जिल्हा ठरला आहे. गोंदिया जिल्ह्याने सर्वात जास्त उपक्रमामध्ये पुरस्कार पटकावण्याचा मान संपादन केला आहे. राज्यात राबविण्यात आलेल्या महा आवास अभियान 2020-21 चे राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांची नावे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केली आहेत.दरम्यान सर्वात जास्त मंजूर घरकुले पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यात नंदूरबार राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी महा आवास अभियान– 2020-21 राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या अभियानात 5 लाख पेक्षा जास्त घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत.

या अभियानामधे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थाना, 10 अभियान उपक्रमांमध्ये अभियान कालावधीत केलेल्या कामाच्या टक्केवारीच्या आधारे एकत्रित गुणांकन करुन पुढीलप्रमाणे महा आवास अभियान पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मंत्री श्री.मुश्रीफ यांनी दिली.

1) सर्वोत्कृष्ट विभाग : प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण :- कोकण – प्रथम, नागपूर – द्वितीय, नाशिक – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- कोकण – प्रथम, नाशिक – द्वितीय, पुणे – तृतीय.

2) सर्वोत्कृष्ट जिल्हे : प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण :- गोंदिया – प्रथम, धुळे – द्वितीय, ठाणे – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- अहमदनगर – प्रथम, रत्नागिरी – द्वितीय, वर्धा – तृतीय.

3) सर्वोत्कृष्ट तालुके : प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण :- गोरेगाव (जि.गोंदिया) – प्रथम, गगनबावडा (जि.कोल्हापूर) – द्वितीय, अकोले (जि.अहमदनगर)– तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- सडक अर्जुनी (जि.गोंदिया) – प्रथम, मुक्ताईनगर (जि.जळगाव)- व्दितीय, कागल (जि.कोल्हापूर) – तृतीय.

4) सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती : प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण :- नाव (जि.सातारा) – प्रथम, वाडोस (जि.सिंधुदुर्ग) – द्वितीय, तडेगाव (जि.गोंदिया) – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- अंबावडे (जि.पुणे) – प्रथम, अणाव (जि.सिंधुदुर्ग) – द्वितीय, बोरगाव (जि.चंद्रपूर)– तृतीय.

5) सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारती : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- करंजेपुल (जि.पुणे) – प्रथम, देर्डे कोऱ्हाळे (जि.अहमदनगर) – द्वितीय, निंभी खुर्द (जि.अकोला) – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- चिंचवली (जि.ठाणे)– प्रथम, शिरवली (जि.पुणे)- द्वितीय, अंदूरा (जि.अकोला) – तृतीय.

6) सर्वोत्कृष्ट गृहसंकुले : प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण :- लोणी (जि.अहमदनगर)– प्रथम, येडोळा (जि.उस्मानाबाद) – द्वितीय, कणकापूर (जि.नाशिक)– तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- खारेकर्दुणे (जि.अहमदनगर)– प्रथम, अदासी (जि.गोंदिया)- द्वितीय, मुणगे (जि.सिंधुदुर्ग) – तृतीय.

या व्यतिरीक्त, ‘महा आवास अभियान- 2020-21’ मधील विशिष्ट 10 उपक्रमांत संख्यात्मक प्रगतीनुसार उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यांना खालीलप्रमाणे ‘महा आवास अभियान विशेष पुरस्कार’पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

1) सर्वात जास्त भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणारे जिल्हे : प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण :- जळगाव – प्रथम, अमरावती – द्वितीय, अहमदनगर – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- गोंदिया – प्रथम, बुलढाणा – द्वितीय, नाशिक – तृतीय.

2) सर्वात जास्त घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे मंजूरी देणारे जिल्हे : प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण :- गोंदिया – प्रथम, भंडारा – द्वितीय, अमरावती – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- उस्मानाबाद – प्रथम, नांदेड – द्वितीय, बीड – तृतीय.

3) सर्वात जास्त मंजूर घरकुले पूर्ण करणारे जिल्हे : प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण :- गोंदिया – प्रथम, नंदूरबार – द्वितीय, भंडारा – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- अहमदनगर – प्रथम, चंद्रपूर – व्दितीय, गोंदिया – तृतीय.

4) सर्वात जास्त बहुमजली इमारती उभारणारे जिल्हे : कोल्हापूर – प्रथम, सातारा – द्वितीय, बुलढाणा – तृतीय.

5) सर्वात जास्त गृहसंकुले उभारणारे जिल्हे : वर्धा – प्रथम, सातारा – द्वितीय, गोंदिया – तृतीय.

6) सर्वात जास्त घरकुल मार्ट सुरु करणारे जिल्हे : अमरावती – प्रथम, गोंदिया – द्वितीय, भंडारा – तृतीय.

7) सर्वात जास्त लाभार्थ्यांना वित्तीय संस्थांचे गृहकर्ज मिळवून देणारे जिल्हे : भंडारा – प्रथम, नांदेड – द्वितीय, सोलापूर – तृतीय.

8) सर्वात जास्त आदर्श घरांची निर्मिती करणारे जिल्हे : औरंगाबाद – प्रथम, सातारा – द्वितीय, नांदेड – तृतीय.

9) सर्वात जास्त कॉर्पोरेट, स्वयंसेवी आणि सहकारी संस्थांचे सहकार्य घेणारे जिल्हे : पालघर – प्रथम, अहमदनगर – द्वितीय, सोलापूर – तृतीय.

10) इतर विशेष उपक्रम : नाशिक – प्रथम, नागपूर – द्वितीय, सांगली – तृतीय.

हे पुरस्कार वितरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रमुख उपस्थित करण्याचे नियोजित असून पुरस्कार वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात भोंगा आंदोलनाने वेधले लक्ष

Next Post

सुरवाणी जि.प.शाळा फोडली, ३६ हजार रुपयांचे साहित्य लंपास

Next Post
सुरवाणी जि.प.शाळा फोडली, ३६ हजार रुपयांचे साहित्य लंपास

सुरवाणी जि.प.शाळा फोडली, ३६ हजार रुपयांचे साहित्य लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add