शहादा ! प्रतिनिधी
तालुक्यातील जूनवणे येथील प्राथमिक शाळेतिल विद्यार्थ्यांना सानेगुरूजी मित्र मंडळातर्फे ऑफलाइन शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
गेल्या वर्षों पासुन जास्त काळ कोरोना सक्रमण असल्याने शाळा बंद आहे त्यात काही शाळानां ऑनलाईन शिक्षण देण्याची सुरवात केली मात्र ग्रामीण व दुर्गम भागातील गरीब कुटुंबाच्या विद्यार्थ्यांकड़े स्मार्टफोन नाही ,लॅपटॉप नाही,नेटवर्क नाही,मोबाईल रिचार्च अश्या अनेक अडचणी त्यांच्या समोर असल्याने विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहत आहे.त्या साठीच सानेगुरूजी मित्र मंडळातर्फे विद्यार्थ्यांना ऑफलाइन शैक्षणिक साहित्य देण्यात आले यात प्रामुख्याने मराठी अंक तक्ता,मुळाक्षरे, तक्ता,पाढे तक्ता, वह्य,पेन,पेन्सिल, खोडरबर शॉपनर इत्यादीच्या समावेश आहे.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हैदर नुरानी तर प्रमुख पाहुणे म्हणून सानेगुरूजी मित्र मंडळाचे माणक चौधरी, लोणखेड़ा जेष्ट नागरिक संघाचे अध्यक्ष गुलाबराव पवार,
जायन्ट्सच्या आशा चौधरी, विस्तार अधिकारी एस एस तावड़े ,मुख्याध्यापक धरमदास पाटील रविंद्र नानाटतकर आदि उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व प्रथम सानेगुरूजी यांची प्रतिमा पुजन करण्यात आले. कार्यक्रमात माणक चौधरी,एस एस तावड़े हैदर नुरानी यानी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक गुलाबराव पवार यांनी तर सुत्र संचालन गौरी नानावटकर व आभार धरमदास पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी परिश्रम शामलाल पावरा, मनिषा कुंदे, अर्जुन आव्हार यांनी घेतले.