नंदुरबार | प्रतिनिधी –
अंकलेश्वर- बर्हाणपूर महामार्गावर असलेल्या उमरकुवा गावाच्या फाटयासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितमीनुसार, अंकलेश्वर- बर्हाणपूर महामार्गावर उमरकुवा गावाच्या फाटयाजवळ अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत मोटरसायकल (क्र.एम.एच.३९-एच.७४०) ला धडक दिली. यावरील चालक सुरेश आमश्या वसावे (४७) रा.टावली ता.अक्कलकुवा हे मोटरसायकलीवरून डोक्यावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रोहिदास आमश्या वसावे रा.टावली ता.अक्कलकुवा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील चालकाविरूध्द भादंवि कलम ३०४ (अ) २७९, ३३७, ३३८, ४३७ सह मोटरवाहन कायदा कलम १८४ प्रमाणे अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक उल्हास ठिंगळे करीत आहेत.








