नंदुरबार l प्रतिनिधी
२३ एप्रिल हा दिवस जगभर पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस पुस्तकांना समर्पित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर येथील श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयात पुस्तक दिनाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्या सुषमा शाह म्हणाल्या की, पुस्तके केवळ वाचनाचे प्रोत्साहन देत नाहीत. तर जगण्याचा नवा दृष्टीकोन देतात. पुस्तक अनेकांचे एकटेपण दूर करतात, ते सखेसोबती असतात. यावेळी प्रा.राजेंद्र शिंदे यांनी प्राचार्या सुषमा शाह यांना ग्रंथ भेट देवून त्यांचा सत्कार केला. यावेळी उपमुख्याध्यापक राजेश शाह, प्रा.चंद्रकांत सोनवणे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे संयोजन प्रशांत बागुल यांनी केले.