म्हसावद l प्रतिनिधी
ज्या बालकांचे वय शाळेत जाणेयोग्य झाले असेल अशा बालकांना पालकांकडून शाळेत दाखल केले जाते.एकदमच शाळेत आल्यामुळे त्या बालकांमध्ये शाळेबद्दल भीती निर्माण होते.भीतीमुळे ते शाळेत येण्यास तयार होत नाही.ही परिस्थिती लक्षात घेता शाळेत नवीन प्रविष्ट होणाऱ्या विध्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी शासनाने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थे अंतर्गत “शाळा पूर्व तयारी”मेळाव्याचे प्रत्येक शाळेत आयोजन केले आहे.या स्तुत्य उपक्रमामुळे नवीन प्रविष्ट होणाऱ्या बालकांमध्ये शाळेबद्दल भीती दूर होऊन निश्चितच गोडी निर्माण होण्यास मदत होईल,असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्या रोहिणी पवार यांनी मंदाणेता.शहादा)येथे केले.
नंदुरबार जिल्हा प्रशिक्षण संस्था अंतर्गत मंदाणे(ता.शहादा)येथील जि.प.केंद्र शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न झाला.या मेळाव्याचे उदघाटन पं.स.सदस्या रोहिणी पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्रीमती पवार यांनी आपले मत व्यक्त केले.यावेळी गटशिक्षण अधिकारी डी.टी.वळवी,केंद्र प्रमुख एल.पी.परदेशी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र बिरारे,सदस्य अरुण पवार,चुणीलाल ब्राह्मणे,पोलीस पाटील सुभाष भिल,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर मोरे,सामाजिक कार्यकर्ते दिनेश पवार,डायटचे विषय तज्ञ्,पालक वर्ग आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातून रॅली काढण्यात आली.रॅलीत विध्यार्थ्यानी शिक्षण जनजागृती विषयी विविध घोषणा दिल्या.रॅलीनंतर मान्यवारांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी नवीन प्रविष्ट विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर बौद्धिक विकास कक्ष,शारीरिक विकास कक्ष,सामाजिक विकास कक्ष,भावनात्मक विकास कक्ष,गगनपूर्व तयारी कक्ष,भाषा विकास कक्ष आदी कक्षांच्या माध्यमातून मिळाव्यात नवीन विध्यार्थ्यांमध्ये शाळा व अभ्यासाविषयीं गोडी निर्माण करण्यासाठी साहित्य ठेवण्यात आले होते. मेळावा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रीतम रनाळे,मुख्याध्यापक संजय अहिरे,मुख्याध्यापक भास्कर अहिरे,श्रद्धा पवार,राजश्री पवार,सुनील शेळके,सुनील पावरा,शोभा पाटील आदींनी परिश्रम घेतले.