नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय किटकजन्य रोग्य नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर हिवतापाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होवून प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग करुन घेण्यासाठी १ ते ३० एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात हिवताप जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
२५ एप्रिल जागतिक हिवताप दिना निमित्त आज शहरात आरोग्य विभागामार्फत जनजागृती रॅली काढण्यात येवून हिवताप निर्मूलन मोहिमेस सुरवात करण्यात आली. या मोहिमेतर्ंगत जिल्ह्यात दररोज आरोग्य कर्मचार्यांमार्फत ताप रुग्ण सर्वेक्षण करणे, डासांच्या घनतेचे सर्वेक्षण करणे, रॅली, प्रदर्शने, वैद्यकीय अधिकारी सभा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे.याप्रभातफेरीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी, जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील, पारिचारीका तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.