Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अनेक राज्य भारनियमनाने होरपळत असतांना महाराष्ट्रात भारनियमन आटोक्यात, महावितरणचे यशस्वी नियोजन

Mahesh Patil by Mahesh Patil
April 25, 2022
in राज्य
0
राज्यात लोडशेडींगचे संकट टळणार, वीज खरेदी करण्यास मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नंदूरबार l प्रतिनिधी
कोळसा टंचाईमुळे देशभरातील अनेक राज्य वीजटंचाईचा सामना करीत आहेत, राष्ट्रीय भार प्रेषण केंद्राच्या आजच्या आकडेवारी नुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, राजस्थान, यांसारख्या राज्यात ९ ते १५ टक्क्यापर्यत वीजेची तुट असतांना महावितरणने केलेल्या प्रभावी नियोजनामुळे राज्यात ही तूट शुन्य टक्क्यापर्यंत म्हणजेच मागणी एवढा वीजपुरवठा करण्यात आला. त्यामुळे राज्यातील भारनियमन आटोक्यात आले असून महावितरणचे प्रभावी नियोजन यशस्वी होतांना दिसत आहे. परिणामत: मागील चार दिवसांत राज्यातील कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आले नाही. सर्वच वर्गवारीतील फिडरवर महावितरणने अखंडित वीजपुरवठा करून वाढत्या तापमानात ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
देशातील १० प्रमुख राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने वीजनिर्मितीला फटका बसला असल्याने इतर राज्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन केल्या जात आहे. राज्यातील जनतेला भारनियमनातून दिलासा मिळावा यासाठी मुख्यमंत्री ना.श्री.उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत सातत्याने बैठका घेऊन आवश्यक उपाययोजना वेगाने व ताबडतोब करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या नेतृत्वाखाली महावितरणने विजेची मागणी व उपलब्धता याचे प्रभावी नियोजन केल्यानेच राज्यात विजेच्या उपलब्धतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
मागील आठवड्याभरात अदानी पॉवरने आपली उपलब्धता १७०० मेगावॅटवरुन ३०११ मेगावॅट, महानिर्मितीने ६८०० मेगावॅट वरुन ७५०० मेगावॅट याशिवाय एनटीपीसीने ४८०० मेगावॅटवरून ५२०० मेगावॅट पर्यंत विजेची उपलब्धता वाढविलेली आहे, याशिवाय महावितरणच्या सततच्या पाठपुराव्यामुळे साई वर्धा प्रकल्पातील वीज उत्पादन १४० मेगावॅटवरुन २४० मेगावॅटपर्यंत वाढविणे शक्य झाले आहे. सोबतच सीजीपीएलकडून करारीत ७६० मेगावॅटपैकी उर्वरित १३० मेगावॅट वीज पुरवठा २४ एप्रिलपासून सुरु झालेला आहे. तर एनटीपीसीच्या मौदा वीजनिर्मिती प्रकल्पातील बंद असलेला संच २५ एप्रिलपासून कार्यान्वित झाला आहे, त्यामधून २५० मेगावॅट इतका वीजपुरवठा सुरु झाला आहे. या सर्व नियोजनासोबतच, कोयना
जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मिती करून व गरजेनुसार पावर एक्सचेंजमधून उपलब्ध असलेल्या दराने वीजखरेदी करून महावितरणद्वारे मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात येत आहे व यामुळे आज राज्यात कुठेही भारनियमन करण्यात आलेले नाही.
सोमवारी सकाळी महावितरणची विजेची मागणी २३ हजार ८५० मेगावॅट होती. त्यासाठी महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांतून ७३७९ मेगावॅट, केंद्राकडून ५७३० मेगावॅट, उरण गॅस प्रकल्पामधून २१८ मेगावॅट, अदानीकडून ३०११ मेगावॅट, आरपीएलकडून १२०० मेगावॅट, कोयना जलविद्युत प्रकल्पातून ४० मेगावॅट, साई वर्धाकडून २४० मेगावॅट सोबतच बाहेरच्या राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून ११८७ मेगावॅट, राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून १३१४ मेगावॅट, पवन ऊर्जा प्रकल्पांकडून २३९ मेगावॅट, सहवीज निर्मिती प्रकल्पांतून ९७७ मेगावॅट, लघुजलविद्युत व अन्य स्रोतांकडून २२४ मेगावॅट वीज उपलब्ध झाली. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून महावितरणने सर्वच वीजवाहिन्यांवर अखंडित वीजपुरवठा केला आहे तसेच कृषिपंपाना वेळापत्रकानुसार सुरळीत वीजपुरवठा करण्यात येत आहे. अखंडित वीजपुरवठ्याची हीच परिस्थिती सोमवारी (दि.
२५) देखील कायम होती. त्यामुळे राज्यातील नागरिक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या वीज परिस्थिती अनुकूल झाली असली तरी महावितरणकडून प्रभावी नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यालय व जिल्हास्तरावरील वॉर रुमच्या माध्यमातून तासागणिक आढावा घेण्याचे काम सुरु आहे.
विजेची पुरेशी उपलब्धता व भार व्यवस्थापनाद्वारे कोणत्याही परिस्थितीत विजेचे भारनियमन करावे लागणार नाही यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या काळातसुद्धा ही परिस्थिती कायम असावी यासाठी महावितरण प्रयत्नांची परिकाष्टा करीत अहे. तसेच भारव्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यालय व जिल्हा स्तरावर स्थापन केलेल्या वॉर रूममधून आढावा घेतला जात असून महावितरणच्या या प्रयत्नांना ग्राहकांनीही विजेचा अपव्यय टाळून आवश्यक्क्यतेनुसारच विजेचा वापर करून, सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कन्यादान या हिंदु धर्म परंपरेची खिल्ली उडविणाऱ्या आ. अमोल मिटकरीवर नंदुरबार पोलीस दाखल झाली तक्रार

Next Post

जिल्ह्यात हिवताप निर्मूलन मोहिमेस सुरवात

Next Post
जिल्ह्यात हिवताप निर्मूलन मोहिमेस सुरवात

जिल्ह्यात हिवताप निर्मूलन मोहिमेस सुरवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

October 21, 2025
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

October 21, 2025
चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group