नंदुरबार | प्रतिनिधी
नंदूरबार येथे दामदुप्पटीचे आमीष दाखवत एका लाखात फसवणुक करणार्या आर.ई.गोल्ड फायनान्स कंपनीच्या चौघांविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र निळंकठ सोनवणे व त्यांची पत्नी अश्विनी राजेंद्र सोनवणे, अफिकबेग मिर्झा यांच्याकडुन प्रत्येकी २६ हजार ४०० रूपये घेवून दोन महिन्यासाठी कंपनीत गुंतवणूक केल्यास ८० हजार रूपये परताव्याचे आमीष दाखवले. गुंतवणुकीची मुदत संपन्यानंतरही वेळोवेळी गुंतवणुकदारांनी गुंतवणुकीची रक्कम परत मागितली अता दिली नाही. म्हणून जगदिश निळकंठ सोनवणे यांच्या फिर्यादीवरून दिपक अहिरे, आर.ई.गोल्ड फायन्स कंपनीचे चालक अजय कटारिया त्यांची पत्नी, आकाश अजय कटारिया सर्व रा.आर.ई.गोल्ड फायनान्स कंपनी शॉप क्र. २३९ रिझंट प्लाझा, दिंडोली सुरत यांच्याविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, १२० (ब), ४०६, ११४, ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांचे संरक्षण अधिनियम कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पी.बी.मोहिते करीत आहेत.