तळोदा l प्रतिनिधी
नंदुरबार पोलीस उप-अधीक्षक तथा अक्कलकुवा उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत यांच्या राष्ट्रपती गुणवत्ता पदक मिळाल्याबद्दल त्यांचा महात्मा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती व फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
महात्मा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने तळोदा येथील ज्येष्ठ नागरिक भवनाच्या प्रांगणात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने बुधवार दिनांक 20 एप्रिल रोजी सत्यपाल महाराज यांचे शिष्य डॉ रामपाल महाराज धारकर यांचे कीर्तनपर प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अजय परदेशी होते.
या निमत्ताने तळोदा येथील संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने त्यांचा हा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.हा सत्कार संयुक्त जयंती उत्सव समितीचे निमंत्रक डॉ डी.बी शेंडे,अध्यक्ष संतोष केदार, उपध्याक्ष प्रा जे एन शिंदे,कार्याध्यक्ष प्रा डॉ प्रशांत बोबडे, हंसराज महाले,अमोल पाटोळे,प्रा.मुकेश जावरे,प्रा सुनिल पिंपळे,महेंद्र सामुद्रे,राहुल जावरे,सिद्धार्थ नरभवर,पप्पू साळवे,सुभाष शिंदे,शरद साळवे, यांच्यासह फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच तळोदा,जय भिम नवयुक मंडळ व ब्लु टायगर बॉइज, तळोदा यांच्या मार्फत करण्यात आला.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना संभाजी सावंत यांनी या महापुरुषांच्या प्रेरणेतून व विचारातून समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली, त्यांच्या पुण्याईने माझा हा झोपडी ते राजभवनपर्यंत प्रवास शक्य झाला, असल्याचे त्यांनी सांगीतले.