नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील सीबी पेट्रोल पंपाच्या मागे श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त रविवारी दिवसभर वेद मंत्रोच्चाराने धार्मिक पूजा विधि करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत विधी सुरू होती.
नंदुरबार शहरातील सीबी पेट्रोल पंपच्या मागील बाजूस नव्यानेच श्रीराम मंदिर निर्माण करण्यात आलेले आहे. या मंदिरात प्रभू श्रीराम, गणपती व हनुमान मूर्तीची आज रविवारी सकाळी १० वाजेपासून प्रतिष्ठापनेला सुरुवात करण्यात आली.सर्व प्रथम गणपती पूजन करण्यात येऊन पुण्याह वाचन, मातृका, वास्तू,योगिनी,क्षेत्रपाल, नवग्रह, रुद्र, प्रधान पीठ स्थापना झाली.
गणपती,राम,लक्ष्मण,सीता व हनुमंत मुर्त्यांचे स्वपन,प्रसाद वास्तू,स्वपन,धान्यादिवास, शयानादिवास, नवग्रह हवन करण्यात आले. मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी, सौ. मेघा रघुवंशी, चिंतन जैन,सौ.केजल जैन, भावेश जैन, सौ.अंजू जैन यांनी सपत्निक पूजा विधी केले तर प्रदीप दवे,राजू शुक्ल, प्रशांत नाईक,प्रसाद बयानी,श्रीकांत जोशी पौरोहित्य म्हणून काम पहात आहेत. यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी उपस्थित होत्या.
आज सोमवार दि.२५ एप्रिल रोजी स्थापित देवता पूजन हवन व मूर्त्यांची स्थापना करून हवन बलिदान व पूर्णाहुति करण्यात येईल.त्यानंतर सकाळी ११ वाजेपासून भंडारा वितरित करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन माजी आ. चंद्रकांत रघुवंशी, माजी नगरसेवक मदनलाल जैन, उद्योजक मनोज रघुवंशी, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र चंदरमल जैन यांनी केले आहे.








