नंदुरबार l प्रतिनिधी
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2019-20 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत श्रीरामपूर ता. नंदुरबार या ग्रामपंचायतीस विभागस्तरीय तृतीय क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे .
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2019-20 अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अँड. सीमा वळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरिय समितीने तपासणी केली होती . या तपासणीत जिल्हा स्तरावर श्रीरामपूर ता. जि . नंदूरबार यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. यामुळे
विभागस्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेकरीता विभागस्तरीय तपासणी अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सुनील पठारे , लेखाधिकारी उदय कुलकर्णी यांच्या सामितीने केली . यावेळी समिती मार्फत गावातीत शाळा , अंगणवाडी , पिण्याचे पाण्याचे स्त्रोत , घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापन आदी कामांची पाहणी करण्यात आली होती .
सदर तपासणी समितीने प्रदान केलेल्या गुणांच्या आधारे नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकताच विभागस्तरीय निकाल जाहीर केला असून यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत श्रीरामपूर ता. जि . नंदुरबार व सावेखडे खु . ता . जि. जळगाव या ग्रामपंचायतीस तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक विभागून दिले आहे . तसेच सांडपाणी व्यवस्थापन या घटकांतर्गत उत्कृष्ट काम केल्याने श्रीरामपूर ग्रामपंचायतीस स्व. वसंतराव नाईक या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . यामुळे ग्रामपंचायतीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धे अंतर्गत विभाग स्तरावरून तीन लक्ष रुपयांचे रोख पारितोषिक व प्रमाणपत्र तर स्व. वसंतराव नाईक विशेष पुरस्कारातर्गत तीस हजार रुपयांचे रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतीस मिळालेल्या या पुरस्काराबद्दल जिल्हा परिषेदेच्या अध्यक्षा अँड सिमा वळवी, उपाध्यक्ष अँड राम रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , सर्व सन्मा . सभापती , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार , प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील , उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील , गट विकास अधिकारी महेश वळवी यांनी माजी सरपंच शत्रुघ्न गांगुर्डे , ग्रामसेविका रूपाली देवरे व ग्रामस्थ तसेच फिनीश सोसायटी , डी. सी. एस . व बायफ या सामाजिक संस्थांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले आहे.








