नंदूरबार l प्रतिनिधी
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वर्षातून दोन वेळा राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवण्यात येत असते . त्या अनुषंगाने जिल्ह्यात नवापूर तालुक्यात हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत प्रतिबंधात्मक मोहीम माहे एप्रिल ते मे महिन्यात राबविण्यात येणार असल्याने नवापूर तालुका वगळून सर्व तालुक्यात जंतनाशक मोहीम दि. २५ एप्रिल रोजी राबवण्यात येणार आहे .
लहान मुलांनी जंतनाशक औषधी घेतल्याने त्यांच्यातील रक्तक्षयाचा आजार कमी होउन आरोग्यात सुधारणा होते . बालकांचा शारीरिक व मानसिक विकास होऊन अन्य संसर्गाची प्रतिकार करण्याची क्षमता वाढते . त्यामुळे येत्या २५ एप्रिल रोजी १ ते १ ९ वयोगटातील मुलामुलींना जंतनाशकाचे औषध देऊन राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री , मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषद नंदुरबार यांनी दिल्या . राष्ट्रीय जंतनाशक दिन राबवीण्यात येणाऱ्या मोहिमेचा आढावा जिल्हा कार्यबल समिती सभेत घेण्यात आला . दि. २५ एप्रिल रोजी सर्व शासकीय व खाजगी शाळा , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व अंगणवाडी व शाळाबाह्य मुलामुलींना सामुदाय स्तरावर जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत . या मोहिमेसाठी जिल्ह्यातील एकूण शाळा १६९ ८ . अंगणवाडी २०९३ , आरोग्य संस्था सर्व इत्यादी ठिकाणी राबवण्यात येणार आहे . जिल्ह्यात या मोहिमेत ४ लाख २८ हजार ७८५ पात्र लाभार्थीना जंतनाशकाचे समक्ष औषध देण्यात येणार आहे . या बाबत संबंधित यंत्रणेस सूचित करण्यात आले आहे . दि. २५ एप्रिल रोजी जे विद्यार्थी गैरहजर , आजारपण अथवा काही कारणास्तव जंतनाशक गोळ्या घेऊ शकले नाहीत अश्यांसाठी दि. २९ एप्रिल रोजी होणाऱ्या मॉपअप दिनी अंगणवाडी , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व घरोघरी जाऊन देण्यात याव्यात . हे औषध मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी शासनामार्फत विनामूल्य देण्यात येतात . या औषधाचे कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत जंतमुळे होणारे त्रास व औषधांचा परिणाम व महत्व बाबत पालकांना आरोग्य शिक्षण देण्यात यावे . कार्यक्रमाची जास्तीत जास्त जनजागृती करण्यात यावी . सभेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . गोविंद पंडित चौधरी , अति . जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.एल.बावा , जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ . संजीव वळवी , उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल कल्याण कृष्ण राठोड , शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) मच्छिंद्र कदम , शिक्षणाधिकारी प्राथमिक सतीष चौधरी ) , तालुका आरोग्य अधिकारी सर्व नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी , स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते .








