नवापूर ! प्रतिनिधी
जागतिक स्तनपान सप्ताह निमित्ताने नवापूर प्रकल्पातील धनराटबिट अंतर्गत अंगणवाडी केंद्र धुळीपाडा येथे कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उषा गावित यांनी स्वीकारले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी संजय कोंढार हे उपस्थित होते. यावेळी श्री.कोंढार यांनी आपल्या मार्गदर्शनात चीक दुधाचे महत्त्व मातांना पटवून सांगितले तसेच बाळाचे पहिले हजार दिवस हे महत्वाचे असून पालकांनी त्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले. यावर्षीचे जागतिक स्तनपान सप्ताहाचे घोषवाक्य “स्तनपान संरक्षण सामूहिक बांधिलकी” हे असून त्यानुसार कार्यक्षेत्रातील सर्वांनीच बाळाच्या विकासासाठी स्तनपानाबाबत जनजागृती करावी असे सांगितले.या प्रसंगी बीट पर्यवेक्षिका श्रीमती वैशाली पाटील यांनी स्तनपान व बालकाचा विकास याविषयी मार्गदर्शन केले. शून्य ते तीन वर्ष हा कालावधी बाळाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा काळ असून या काळास निर्णायक काळ म्हटले जाते म्हणूनच या वयोगटातील बालकांच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे केले तरच बाळाची वाढ व विकास योग्य गतीने होईल यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्नशील राहावे असे सांगितले. तसेच सदरील कालावधी गावातील सर्वच पालकांनी व लाभार्थ्यांनी तरंग सुपोषित महाराष्ट्र वर संपर्क करून योग्य ती माहिती मिळवावी यासाठीही मार्गदर्शन केले. तसेच स्टीफन मस्कनळी पिरामल फाऊंडेशन यांनीदेखील माता समुपदेशन कसे करावे व पाठपुरावा कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविका मार्थाताई यांनी मातांना केलेले समुपदेशन याबाबत अनुभव कथन केले.
सदरील कार्यक्रमासाठी सरपंच उषा गावित, उपसरपंच लाजरस गावित,माजी सरपंच उमेश गावित,अमेरिकन इंडिया फाऊंडेशन चे सदस्य, गावातील गरोदर माता ,स्तनदा माता,अं. सेविका संघटनेच्या अध्यक्ष लताताई गावित, धनराट 1व धनराट 2 बीट मधील सर्व सेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी ताई झेलूताई गावीत यांनी केले तर आभार प्रदर्शन उषा गावित यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनराट बीट अंतर्गत असलेल्या अंगणवाडी ताई व मदतनीस ताई यांनी परिश्रम घेतले.