नंदुरबार ! प्रतिनिधी
भालेर येथील क.पु.पाटील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मुकेश पाटील याने जळगाव येथे कोरोना काळात बेवारस असलेल्या प्रेतांवर स्वतः जीवाची पर्वा न करता आपल्या स्वतःच्या शिष्यवृत्तीच्या पैशातून खर्च करून मुकेश व त्यांचे सहकारी यांनी असे समाजपयोगी कार्य केले तसेच गरजूंना मोफत जेवण दिले.”एक आठवण आपल्या दारी”या उपक्रमाअंतर्गत अनेक वृक्षारोपण केले असे विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवली याची दखल घेऊन मराठी राज्य पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांनी मुंबई येथे त्यांचा गौरव केला.त्या नंतर विविध सामाजिक संस्थानी देखील त्यांचा गौरव केला मुकेश पाटील यांनी तेथेच न थांबता पुरस्काराच्या रकमेतून गरजूंना जेवणाची सोय करून दिली अशा 1000ते 1200 लोकांना जेवणाच्या थाळी उपलब्ध करून दिल्या ह्या केलेल्या कार्याची दखल म्हणून शाळेचा माजी विद्यार्थी मुकेश पाटील यांचा गौरव करण्यात आला .
यावेळी मुकेश पाटील यांचा शाल,श्रीफळ,बुके देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मनोज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले की, लहानपणा पासूनच शाळेचा विद्यार्थी असतांना मनात ठरविले होते की एक दिवस मी पण ह्या मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहील ह्याची इच्छा आज या कार्याच्या निमित्ताने पूर्ण झाली व यापुढेही असेच सामाजिक सेवेचे कार्य चालू राहील व गावाचे व शाळेचे नाव मोठे करेन असे सांगितले . यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या सौ.व्ही.बी. चव्हाण पर्यवेक्षक ए.व्ही. कुवर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.