Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्ह्यातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन

team by team
April 23, 2022
in शैक्षणिक
0
नंदूरबार जिल्ह्यातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,तळोदा अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये शैक्षणिक वर्ष सन २०२२-२०२३ प्रवेशासाठी इयत्ता सहावीच्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता अनुसुचित आणि आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकडून १५ मे २०२२ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर प्रवेश प्रक्रियेकरीता ३ टक्के जागा व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ जागा आरक्षित असतील. यासाठी अनुसूचित जाती, आदिम जमातीच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सरासरी ६ लाखापेक्षा कमी असावे. त्याबाबतचा सक्षम प्राधिकार्‍यांचा दाखला सोबत जोडावा. प्रवेश अर्जासोबत जातीचा दाखला, शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र गुणपत्रक जोडावे. एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये इयत्ता ६ वी च्या वर्गात एकूण ६० विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार व गुणानुक्रमे प्रवेश देण्यात येईल. सदर प्रवेश प्रक्रियेकरीता प्रवेश पूर्व स्पर्धापरीक्षेचे ५ जून २०२२ रोजी सकाळी ११ ते १३ या वेळेत दोन परीक्षा केंद्रावर (अक्कलकुवा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ) शासकीय आश्रमशाळा तालंबा, ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे तर ( धडगाव व तळोदा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ) शासकीय आश्रमशाळा सलसाडी ता.तळोदा जि.नंदुरबार या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी सदर परीक्षेला प्रविष्ट होणार्‍या शाळेतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिनांकास परिक्षा केंद्रावर सुरक्षितपणे घेवूनजाण्याची व्यवस्था करावी. तर जिल्हा परिषद व इतर शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळेतील परिक्षार्थी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर घेवून जाण्याची जबाबदारी संबंधित पालक, शिक्षकांची राहील. पालकांनी आपल्या अर्जामध्ये पाल्यांना एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल करीता प्राधान्यक्रम देता येईल व त्यानुसार निवड झाल्यास त्याच प्राध्यान्यक्रमाने एकलव्य मॉडेल स्कूल मध्ये प्रवेश देण्यात येईल. अर्जांत विद्यार्थ्यांची जन्मतारीखेची अचुक नोंद घेण्यात यावी. प्रवेश अर्जामध्ये नमुद प्रमाणपत्रावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी, शिक्का, नाव असणे अनिवार्य असेल. विद्यार्थ्यांना अर्ज भरतांना अर्जात संपर्क क्रमांक अनिवार्य असेल. प्रवेश प्रक्रीयेसंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा सर्वाधिकार महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी नाशिक या संस्थेस असेल. एकलव्य मॉडेल रेसिडेंसियल स्कूलमध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रकल्प कार्यालयात उपलब्ध असून परिपूर्ण अर्ज भरुन १५ मे २०२२ पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,तळोदा येथे जमा करावे. असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले आहे

बातमी शेअर करा
Previous Post

युवक महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद तर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चोपडाचा संघ ठरला उपविजेता

Next Post

दरोडा टाकुन खंडणी मागणाऱ्या आरोपींच्या नंदुरबार पोलीसांनी आवळल्या मुसक्या, 9 जणांना केली अटक

Next Post
अबब:वीज वितरण कंपनीत ६३ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक लेखापालविरूध्द गुन्हा दाखल

दरोडा टाकुन खंडणी मागणाऱ्या आरोपींच्या नंदुरबार पोलीसांनी आवळल्या मुसक्या, 9 जणांना केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add