Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अमोल मिटकरींच्या बेताल वक्तव्याचा नंदुरबार ब्राम्हण समाजातर्फे निषेध, कारवाईची मागणी; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

team by team
April 23, 2022
in राजकीय
0
अमोल मिटकरींच्या बेताल वक्तव्याचा नंदुरबार ब्राम्हण समाजातर्फे निषेध, कारवाईची मागणी; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नंदुरबार l प्रतिनिधी
हिंदू देवता व हिंदू समाजातील पुरोहित (ब्राह्मण) यांचे बाबत बेताल व खोटे वक्तव्य करुन हिंदू देवतांची बदनामी करुन समाजात तेढ व वैमनस्य वाढेल असे वक्तव्य करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील पुरोहित संघातर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील सत्तारुढ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व आमदार अमोल मिटकरी यांनी १९ एप्रिल २०२२ रोजी सांगली येथील पक्षाच्या जाहीर सभेत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांचेसह असंख्य लोकांचे उपस्थितीत जाहीरपणे वक्तव्य करताना हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या रामभक्त हनुमान (मारुती) स्तोत्र म्हणताना मारुती स्तोत्र व हनुमान चालिसा याचे मिश्रित अभद्र भाषेत टिका टिप्पणी करताना हिन्दू देवतेचा व श्रध्देचा जाणीवपूर्वक अवमान करुन जाती धर्मात तेढ वाढवून वितुष्ट निर्माण केले आहे. याशिवाय या महाशयांनी परंपरागत हिन्दू विवाह पध्दतीवर टीका करताना कन्यादान या हिंदू संस्कार पध्दतीवर गलिच्छ व द्वेषमूलक टीका केली आहे. हिंदू धर्म पध्दतीप्रमाणे मुलीचे (कन्येचे) वडील मुलाचे (नवरदेवाचे) वडिलांकडे कन्यादान करुन मुलीचा (कन्येचा) सांभाळ करण्याचे सांगतात. पण या महाशयांनी या हिंदू धर्मातील संस्काराचे विधीवर खोटी टीका करुन हिंदू धर्मियामध्ये तेढ निर्माण करण्याचे वक्तव्य केलेले आहे. वास्तविक या कोणत्याही विधीशिवायही प्रेम विवाह होतच असतात, पण हिन्दू धर्मियांचे संस्काराबद्दल बेताल व गलिच्छ टीका करुन हिंदू धर्मियांच्या भावना दुखवून ठेच पोहचविली आहे. व जाणीवपूर्वक तेढ निर्माण केली आहे. कोणत्याही विवाह प्रसंगी मम भार्या समर्पित असे वाक्य कोणताही पुरोहित वा ब्राह्मण कोणत्याही विवाह प्रसंगी उच्चारत नाहीत. पण या महाशयांनी स्वतः हे ऐकल्याचे व नवरदेवाला कानात सांगितल्याचे मोघमपणे जाहीर वक्तव्य केले. पण हे कोणत्या मित्राचे लग्नात कोणत्या गांवात कोणत्या पुरोहित, ब्राह्मण वा महाराजानी असे म्हणले याविषयी कांहीही न सांगता मोघमपणे समाजात तेढ वाढविण्यासाठीच फक्त हे वक्तव्य केले आहे हे यावरुन स्पष्ट होत आहे. या सभेत जयंत पाटील व धनंजय मुंडे हे महाराष्ट्र राज्यातील शासनातील मंत्री महोदयांनी हजर असतानाही निषेध केलेला नाही वा कारवाई करण्याचे आदेश दिलेले नाहीत. उलट या वक्तव्यास हसून दाद दिलेली आहे. म्हणजेच या शासन प्रतिनिधीचा या हिन्दू धर्मात तेढ निर्माण करण्यास सहमती आहे. हे स्पष्ट दिसून येत आहे. या सांगली येथील भाषणाची विविध फेसबूक वा व्हॉट्सअप ग्रूपवर आलेली व्हिडिओ क्लिप संबंधीत पोलीस स्टेशनकडून तपासून घेवून संबंधीत अमोल मिटकरी व सदर सभा आयोजक आणि सदर सभेत हजर राहून कोणतिही कारवाई न करता या तेढ िनर्माण करणार्‍या वक्तव्यास दाद देणार्‍या शासन प्रतिनिधी जयंत पाटील व धनंजय मुंडे यांचे विरुध्द भारतीय दंड संहितेनुसार उचित कारवाई त्वरीत करावी. समाज बंधू भगिनीकडून उद्रेक होवून कोणतिही अप्रिय, अनुचित वा असंवैधानिक घटना झाली तर त्यास कोणताही हिंदू समाज बांधव वा भगिनी जबाबदार राहणार नाही. समाजात तेढ निर्माण करणार्‍यांवर तातडीने कारवाई केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेप्रसंगी राजू शुक्ल, अजित कुलकर्णी, चारुदत्त कळवणकर, व्ही.आर.जोशी, अनिल शर्मा, रवींद्र इंगळे, चेतन जोगी, निर्मल शर्मा, आशिष दवे, गणेश पाठक, मनीष त्रिवेदी, शेखर पांढरकर, तुषार उदारे, सागर कुलकर्णी, दीपक कुलकर्णी यांच्यासह जिल्हा पुरोहित संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आकडेबहाद्दरांविरुद्ध महावितरणची धडक मोहीम हजारो अनधिकृत जोडण्या हटवल्या, मोहीम होणार तीव्र

Next Post

प्रा.डॉ.दिनेश देवरे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

Next Post
प्रा.डॉ.दिनेश देवरे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

प्रा.डॉ.दिनेश देवरे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add