नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातून दोन तर तळोदा शहरातील एक अशा तीन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा शहरातील सालदार नगर येथील संतोष अर्जुन भोजने यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच्.३९ एएच ०१०२) खेडकोचरा ते रायखेड गावाच्या रस्त्यादरम्यान चोरट्याने चोरुन नेली. याबाबत संतोष भोजने यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.अजित गावित करीत आहेत. तसेच शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील रामकृष्ण देविदास पाटील यांच्या मालकीची दुचाकी (क्र.जीजे.०५ एलबी ५८४९) घराच्या अंगणातून चोरट्याने लंपास केली. याबाबत रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.जितेंद्र ईशी करीत आहेत. तर तळोदा शहरातील चंदनविला येथील मोतीलाल अशोक गोजरे यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एम ९४४६) चंदनविला येथील घरासमोरुन चोरट्याने चोरुन नेली. याबाबत मोतीलाल गोजरे यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.हर्षल साळुंके करीत आहेत.










