तळोदा l प्रतिनिधी
पूणे येथे झालेल्या महाराष्ट्र मेडीक्वीन मिसेस स्पर्धेमध्ये तळोदा येथील डॉ.समता दत्तात्रय चौधरी ह्या “महाराष्ट्र ग्लॅमरस ब्युटी मेडीक्वीन ठरल्या आहेत.
पूण्यातील बालेवाडी येथे मेडीक्वीन मेडीको पेजंट मिसेस महाराष्ट्र २०२२ या कार्यक्रमाची ऑर्किड हाॅटेलात महाराष्ट्र मेडीक्वीन स्पर्धेची अंतिम फेरी झाली. अभिनेते समीर धर्माधिकारी, डॉ.रेवती राणे, डॉ उज्ज्वला बर्दापूरकर, डॉ.श्रद्धा जावंजल, सोशल वर्क ज्युरी डाॅ.अमोल गिते आदींनी परिक्षकाचे काम पाहिले. अभिनेत्री पूजा सावंत, सुशांत शेलार, तेजपाल वाघ, सुनेत्रा पवार, शितल रांका आदिंजन उपस्थित होते.
मेडीक्वीन मेडिको पेटंट तर्फे कार्यकारी अध्यक्षा डॉ प्रेरणा बेरी-कालेकर आणि सचिव डॉ.प्राजक्ता शहा यांच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विवाहित महिला डॉक्टरांसाठी सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात येते. यात सर्व पॅथींमध्ये सेवा करणाऱ्या सर्व डॉ.साठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत विविध भागातून सुमारे २०० महिला डॉक्टरांनी सहभाग नोंदविला होता. यातून ५५ स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले. या ५५ स्पर्धकातून ५ विनर राॅयल कॅटेगरीत तळोदा येथील मूळ रहवासी व सध्या ठाणे येथे स्थित असलेली डॉ.समता चौधरी यांची निवड करण्यात आली. त्या तळोदा येथील शिक्षक सौ. भावना व प्रकाश चौधरी या दांपत्याची सुकन्या तर ठाणे येथील डॉ दत्तात्रय शिवाजी चौधरी यांच्या पत्नी आहेत.