Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहिमेचे आयोजन

team by team
April 20, 2022
in कृषी
0
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहिमेचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी 24 एप्रिल ते 1 मे 2022 या कालावधीत ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षांतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहिम 24 एप्रिल 2022 ते 1 मे 2022 या कालावधीत देशभरात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्राधान्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी ) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे 1 लाख 30 हजार 345 लाभार्थ्यांपैकी 1 लाख 3 हजार 703 लाभार्थींना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले असून 26 हजार 642 नोंदणीकृत लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करावयाचे आहे. यासाठी 24 एप्रिल 2022 रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये पी.एम.किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष ग्रामसभेत प्रधानमंत्री किसान सन्मान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज वाटप करण्यात येईल.
ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विभाग, नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बँक या सर्व यंत्रणाच्या समन्वयाने मोहिम राबविण्यात येईल. यानुसार सर्व संबंधित बँक किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याच्या विहित कार्यपद्धतीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज विशेष ग्रामसभेत घेऊन 1 मे 2022 पर्यंत त्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करण्याची कार्यवाही पूर्ण करतील. यासाठी जिल्हा अग्रणी बँक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित सर्व बँकांनी योजनेतील लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची आणि त्यांचे पी.एम.किसान योजनेचा लाभ मिळत असलेले बँक खाते आधार आधारीत पेमेंटसाठी अधिकृत करून घेण्यासाठी संनियंत्रण करावे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा कंपन्यांचे जिल्हा व्यवस्थापक व कृषि विभागाने 24 एप्रिल रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत पीकविमा योजनेविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात येईल. शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी 26 एप्रिल 2022 रोजी गावनिहाय “पीक विमा पाठशाला” चे आयोजन करण्यात येणार आहे. या पाठशाळेमध्ये शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करुन सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करुन “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” मोहीम यशस्वी करावी. तसेच या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री व जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक, जयंत देशपाडे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, नवापूर येथे आरोग्य मेळाव्यात खा. डॉ हिना गावीत यांचे प्रतिपादन

Next Post

युवारंगातून मैत्री व बंधुभावाचा तरुणाईने प्रसार करावा : कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी

Next Post
युवारंगातून मैत्री व बंधुभावाचा तरुणाईने प्रसार करावा :  कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी

युवारंगातून मैत्री व बंधुभावाचा तरुणाईने प्रसार करावा : कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add