नवापूर | प्रतिनिधी
नवापूर पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मौजे धनराट येथील सन २००८ साली पोस्टमास्टर म्हणून कार्यरत असलेले गुलाब सुमन गावित यांनी पोस्ट खात्यात जमा करत असलेल्या ८१ हजार ६०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने न्यायालयांनी तीन वर्ष कारावासाची व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे की नवापुर तालुक्यातील धनराट गावातील परशुराम गावित यांनी पोस्टात त्यांच्या परिवारातील सहा सदस्यांचे दरमहा रुपये ५०० रुपये ६०० प्रमाणे बचत खाते उघडले होते या बचत खात्यांमध्ये परशुराम गावित यांनी दरमहा ५०० व ६०० रुपयांचा जून २००५ ते मे २००७ दरम्यान भरणा केला या भरणाची एकूण रक्कम ८१ हजार ६०० रुपये संबंधित पोस्ट मास्टर गुलाब सुमन गावीत यांनी संबंधित खातेदाराच्या खात्यात जमा न करता स्वतःकडे ठेवून अपहार केला या प्रकरणी सन २००८ साली सरकारतर्फे प्रताप सोनवणे यांनी पोस्टमास्टर गुलाब गावित त्यांच्याविरोधात भादवि कलम ४०९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता पोलीस तपास अधिकारी ए.एन.सय्यद यांनी संपूर्ण तपास करत नवापूर येथील फौजदारी न्यायालयात पोस्टमास्टर गुलाब सुमन गावित यांच्याविरुद्ध दोषापत्र दाखल केले.सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.कोर्टात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपी पोस्टमास्टर गुलाब सुमन गावित यांना नवापूर फौजदारी न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर.बी.बहिरवाळ यांनी आरोपीस तीन वर्ष कारावासाची व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.दंडाची रक्कम न भरल्यास अधिक सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे सरकार पक्षातर्फे वकील अजय सुरळकर यांनी काम पाहिले.