नंदूरबार l प्रतिनिधी
गेल्या सहा महिन्यापासून परिवहन महामंडळाच्या लालपरीची ठप्प झालेली प्रवासी सेवा हळूहळू पूर्वपदावर येत असून नंदुरबार आगारात प्रवासी संघटनेकडून एसटी बसचे दीडशे फलक आगारप्रमुख मनोज पवार यांच्या उपस्थितीत भेट देण्यात आले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परिवहन विभागातील एसटी तसेच इतर साहित्य अस्तव्यस्त आहे. आगारात अनेक बसेसच्या समोरच्या काचेवर खडूने गावाचे नाव लिहिले जात होते. प्रवाशांची गैरसोय टाळावी या उद्देशाने प्रवासी संघटनेच्या वतीने दीडशे नवीन फलक देण्यात आल्याची माहिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी दिली आहे. यावेळी विशेष म्हणजे जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक विजय पवार, ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, धनराज माळी, राकेश कलाल, अविनाश भामरे आगारप्रमुख मनोज पवार आदी उपस्थित होते.










