नंदूरबार | प्रतिनिधी –
नंदुरबार येथील प्रसिद्ध डॉ. रोशन भंडारी यांना मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये नुकताच राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल तळोदा येथील जैन समाज बांधवांकडून डॉ.रोशन भंडारी यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोना महामारी काळात जीवाची पर्वा न करता वैद्यकीय सेवा देणारे विशेषतः गेल्या दोन वर्षाच्या कठीण काळातही जिवाची पर्वा न करता त्रस्त रुग्ण आणि त्यांच्या भेदरलेल्या कुटुंबियांना सावरण्याचे केवळ वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून कार्य करणार्या राज्यभरातील निवडक ५१ वैद्यकीय व्यवसायिकांना त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात आलो. तळोदा शहराचे सुपुत्र व सध्या नंदुरबार येथे गेल्या १६ वर्षांपासून तुलसी क्रिटीकल केअर क्लिनिकच्या माध्यमातून डॉ.रोशन भंडारी हे रूग्णसेवा करीत आहेत. यानिमिताने तळोदा डॉ.रोशन भंडारी यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल तळोदा शहराचे नाव देखील उंचावले आहेत्र म्हणून जैन समाज बांधवांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गौतम जैन, हंसू भंडारी, किर्तीभाई शहा, अँड.संदीप जैन, सुभाष चोपडा, डॉ.संदीप चोपडा, महावीर जैन, दिनेश बोहरा, गुड्डू बोहरा, दिलीप सेठीया, कांतीलाल जैन, जयू जैन, राजेंद्र कोचर, धनराज पारख, अँड.अल्पेश जैन, डॉ.पंकज जैन यांसह तळोदा शहरातील जैन समाज बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ.रोशन भंडारी म्हणाले की, मला मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराने माझी जबाबदारी आणखीन वाढली आहे. यापुढे देखील मी गरीब रुग्णांना कशी जास्तीत जास्त सेवा देता येईल यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील व आपण सर्व समाज बांधवांनी माझा सत्कार केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. यावेळी गौतम जैन व किर्तीकुमार शाहा यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. सह्याद्री उद्योग समूह नगर पुरस्कृत तसेच न्यूज लाईन मीडिया प्रा. लि. व ऑन धिस टाईम मिडीया प्रा. लि.आयोजित हे पुरस्कार संस्थेचे प्रमुख संदीप थोरात यांच्या हस्ते डॉ.रोशन भंडारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक पुस्तक असे सन्मानाचे स्वरूप होते.