Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खापर येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने लावण्यात आली पाणपोई, पोलीस निरीक्षक इसामोद्दीन पठाण यांच्या हस्ते उदघाटन

team by team
April 16, 2022
in सामाजिक
0
खापर येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने लावण्यात आली पाणपोई, पोलीस निरीक्षक इसामोद्दीन पठाण यांच्या हस्ते उदघाटन

खापर l प्रतिनिधी
दैनंदिन कामकाजासाठी खापर गावात येणाऱ्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या अक्कलकुवा तालुका शाखेच्या वतीने खापर येथे पाणपोई लावण्यात आली अक्कलकुव्याचे पोलीस निरीक्षक इसामोद्दीन पठाण यांच्या हस्ते पाणपोईचे उदघाटन संपन्न झाले.
सध्या सर्वत्र नागरिकांना मोठया प्रमाणावर उन्हाची तीव्रता जाणवत आहे, खापर परिसरातील शेकडो नागरिक दररोज खापर गावात आपल्या दैनंदिन कामकाजा करीता येत असतात त्यांना ही उन्हाची तीव्रता जाणवते, उन्हा तान्हात फिरत असतांना जीवाची लाही लाही होऊन घसा कोरडा पडतो.अशा वेळी साहजिकच प्रत्येकाला थंड पाणी मिळण्याची आस असते.पण प्रत्येक गरीब लाचार नागरिकांस थंड पाण्याची बाटली विकत घेऊन ते पिणे शक्य नाही त्यामुळे नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन सामाजिक जाणिवेतून महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने उन्हाळ्याच्या मर्यादीत दिवसां साठी एक छोटेखानी पाणपोई खापर येथे लावण्यात आली. पाणपोईचे उदघाटन पोलीस निरीक्षक इसामोद्दीन पठाण यांच्या हस्ते पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीरकुमार ब्राम्हणे, जिल्हा संपर्क प्रमुख अरुणकुमार मोरे, गावाचे उपसरपंच विनोद कामे,देवा वसावे,इरा इंटरनॅशनल स्कुलचे चेअरमन योगेश सोनार,अजय पटेल व चंद्रकांत चव्हाण,योगेश चौधरी,धनराज पावर,असलम बलोच, ताहीर बलोच, तुषार मराठे,योगेश पवार आदी उपस्थित होते.नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई लावण्याकरिता महाराष्ट्र पत्रकार संघाचे अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मिलिंद गुलाले,कार्याध्यक्ष मनोज चौधरी,उपाध्यक्ष महावीर जैन,सचिव प्रशांत मराठे, अल्ताफ मल्कानी,जगदीश खोंडे,हेमंत परदेशी, शिवमकुमार मोरे, आदींनी पुढाकार घेत परिश्रम घेतले.

खापर मोठ्या बाजारपेठचे गाव आहे,येथे विविध कामांसाठी जवळपासच्या गाव-पाड्यावरून लोक येत असतात.त्यांसाठी पाणपोई उपयुक्त असा उपक्रम ठरणार आहे.अक्कलकुवा तालुक्यातील महाराष्ट्र पत्रकार संघाच्या तर्फे खापर चार रस्त्यावर पाणपोई लावण्याची संकल्पना खरोखरच कौतुकास्पद आहे.इतरांनीही त्याच्या आदर्श घ्यावा.
आय.एन.पठाण
पोलीस निरीक्षक अक्कलकुवा

बातमी शेअर करा
Previous Post

शब्द फिरवल्याने कार्यकर्ते काय आदर्श घेतील; भान ठेवूनच बोलावे, नंदुरबारात एकनाथराव खडसेंच्या चंद्रकांत पाटलांना सवाल

Next Post

डॉ.भंडारी यांना आरोग्यभूषण पुरस्कार, जैन समाजातर्फे सत्कार

Next Post
डॉ.भंडारी यांना आरोग्यभूषण पुरस्कार, जैन समाजातर्फे सत्कार

डॉ.भंडारी यांना आरोग्यभूषण पुरस्कार, जैन समाजातर्फे सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add