नंदुरबार | प्रतिनिधी-
नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील रेल्वे पुलाजवळ स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मोटरसायकला थांगवुन ३१ हजार २०० रुपये किमतीचा अवैध विमल गुटखा जप्त केला असुन याप्रकरणी वापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचपाडा रेल्वेगेटजवळी पुलाजवळ रविश दासू वळवी रा.मोठे कडवान, ता .नवापूर हा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या मानवी शरीरास अपायकारक असलेला विमल पान मसाला गुटखा विक्री करण्यासाठी मोटरसायकल (क्रमांक एमएच ३९ ए.फ- ४०६३) ने बेकायदेशीररित्या वाहतूक करतांना आढळला. पोलीसांनी त्याला अटक केली असुन, त्याच्याकडून ३१ हजार २०० रुपये किंमतीचा विमल गुटखा जप्त करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोना जितेंद्र तोरवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नासिरखान पठाण करीत आहेत.