नंदुरबार | प्रतिनिधी-
अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील किराणा दुकानदाराच्या घरातून १० लाख ५० हजाराची रोख रक्कम व १ लाख २० हजार रुपये किमतीचे दोन किलो चांदीचे दागिने चोरटयांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील किराणा व्यावसायिक वरदाराम पोलाराम चौधरी मुळ रा.कम्मोकावाडा ता.समदडी जि.वाईमोर (राजस्थान) यांच्या किचनच्या खिडकीची ग्रिल अज्ञात चोरटयाने तोडून आत प्रवेश करत बेडरुमधील गोदरेज कपाटाची चावी कपाटावरील मेडीसीनच्या डब्यातून काढून लॉकर उघडून त्यातील १० लाख ५० हजार रुपयांची रोकड व १ लाख २० हजार रुपयांच्या दोन किलो चांदीचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी वरदाराम चौधरी यांच्या फिर्यादीनुसार अक्कलकुवा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर करीत आहेत.