खापर l प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज अक्कलकुवा येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून शाळेचे जेष्ठ शिक्षक बी .एल. घरटे होते. तर शाळेचे प्राचार्य एच . के .चव्हाण , उपप्राचार्य आर यु .वळवी सर हे प्रमुख उपस्थित होते.या प्रसंगी विद्यार्थी मनोगतात गंगा लेहऱ्या पाडवी ,आरती पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर शिक्षक मनोगतात शाळेचे जेष्ठ शिक्षक आर. एच. महिरराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी शाळेचे प्राचार्य एच. के. चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या जीवनात आचरणात आणावे व त्यांचे आदर्श घ्यावा असे आपल्या मनोगतात सांगितले. सूत्रसंचालन बी. यु. गोसावी यांनी केले तर प्रस्ताविक एम .एन इंगळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.