नंदूरबार l प्रतिनिधी
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग व अक्कलकुवा ब्लड डोनेट गृप यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न झाले.
अक्कलकुवा पंचायत समितीच्या दिगंबरराव पाडवी सभागृहात संपन्न झालेल्या रक्तदान शिबीराच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी नंदकिशोर सुर्यवंशी, अक्कलकुव्याच्या सरपंच राजेश्वरी वळवी, उप सरपंच मुन्ना मक्राणी,मनोज डागा, बापु महिरे, कक्ष अधिकारी गणेश भामरे आदी उपस्थित होते.रक्तदान शिबीराचे उदघाटन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला वाहुन तसेच मेणबत्ती प्रज्वलित करुन करण्यात आले.या याप्रसंगी नंदकिशोर सुर्यवंशी यांनी बाबासाहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकुन रक्तदानाचे महत्त्व सांगितले.महेश कुवर यांनी मनोगत व्यक्त केले.रक्तदान शिबीराची सुरुवात नंदकिशोर सुर्यवंशी,मुन्ना मक्राणी यांनी रक्तदान करुन केली.शिबीरात तालुक्यातील बहुसंख्य शिक्षकां सहीत एकुण 52 दात्यांनी रक्तदान केले.या प्रसंगी डॉ.संदिप वसावे यांनी रक्तदात्यांची वैद्यकीय तपासणी केली.समुपदेशक महेश कुवर, युवराज प्रजापती, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी अतुल कल्याणी, विशाल चौधरी, ईश्वर वसावे, संदिप बुचके, भरत वसावे,राजेंद्र मोरे,शरद पाडवी यांनी रक्तसंकलन केलेरक्तदान शिबीराचे आयोजन व यशस्वीते साठी अक्कलकुवा ब्लड डोनेट गृपचे सुधीरकुमार ब्राम्हणे,महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष दिपक सोनवणे,भाऊसाहेब जाधव, जगदिश धसे ,सचिन बडोले ,विलास तडवी ,दिपक वसावे, सुनिल धुळे ,दिपक कांदे , अंगद शेंडगे ,रुपेशकुमार मोरे ,विलास पवार, बालाजी केंद्रे यांनी परिश्रम घेतले.