नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील होळतर्फे हवेली येथून राजेश कोतवाल यांचा वन्यजीव संरक्षण संस्था नंदुरबारचे सदस्य सर्पमित्र संजय वानखेडे यांना कॉल आला की राजेश कोतवाल यांच्या घराजवळ साप आहे म्हनुन फोन येताच सदर ठिकाणी धाव घेत तेथे गेले असता तेथे मांडुळ जातीचा साप आढळून आला.वानखेडे यांनी त्याला व्यवस्थितरित्या हाताळत पकडुन त्याची नंदुरबार वनविभाग कार्यालयात नोंद करुन वनविभागाचे वरीष्ठ अधिकारी यांच्या निर्देशानुसार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत जाऊन त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानी सोडन्यात आले.तेथे उपस्थित लोकांना सापांबद्दल तसेच वन्यजीव संरक्षण संस्थेबद्दल माहिती देऊन जनजागृती करण्याचेही काम केले.