म्हसावद l प्रतिनिधी
महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या संयूक्त जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषद शाखा शहाद्याच्यावतीने नंदुरबार जिल्ह्यातील सिकलसेल आजाराचे गांभीर्य लक्षात घेता जनतेचे प्राण वाचवण्याच्या द्रुष्टिकोनातून बी.आर.सी.कार्यालय शहादा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागिय अधिकारी श्री. गिरासे यांनी सांगितले की, रक्तदान हे महान दान असून अशा कार्यक्रम पासून ईतरानाही प्रेरणा मिळेल जनतेचे प्राण वाचतील. प्रमुख पाहूणे म्हणून शहादा तहसिलदार श्री. कुलकर्णी, डायटच्या अधिव्याख्याता श्रीमती वनमाला पवार, गटशिक्षणाधिकारी श्री.वळवी विस्तार अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वच विस्तार अधिका-यांनी रक्तदान केले.प्रमुख रक्तदात्यांमध्ये जिल्हा मुख्य सल्लागार हिरालाल पाटील,तालुका कार्यवाह संजय साळी सर प्रकाश पाटील,अनिल सोनवणे,लोखंडे , शशिकांत वसईकर, ईश्वर कोळी ,अनिल पाटील, मनोहर सैंदाणे, किरण मोहिते, अविनाश बर्डे संजय गिरासे,नवलसिंग राजपूत,प्रवीण गंडे, मनोज पिंजारी,रमेश वाडीले, गोपाल गुरखा, मोहन शिंपी,ज्ञानेश्वर चितळकर,भरत पाटील श्रीराम अहीरे, सचिन मोरे, रुपेश नागलगावे चंद्रकांत शिसोदे दरेकर यांनी रक्तदान केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब बावा, सचिन मराठे ,अशोक बागले,जिल्हा सहकार्यवाह किशोर ठाकरे तालूकाध्यक्ष सिध्दार्थ बैसाणे,राजेंद्र सानप, प्रमोद पाटील, दिपक मोरे, महिला आघाडीच्या सिमा जगदाळे, सोनाली एखंडे,लक्ष्मी कुलकर्णी ई. पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले सदर रक्तदान शिबिरात एकूण 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले.