नंदुरबार l प्रतिनिधी
१४ एप्रिल रोजी जोशी गोंधळी सामाजिक सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नंदुरबार जिल्हा शाखेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून खा.डॉ.हिना गावित,अमंळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद सदस्य डॉ.सुप्रिया गावित शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर,सुलभा महिरे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदान केलेल्या काही रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.स्वागताला उत्तर देतांना शिरीष चौधरी यांनी शिक्षकांनी एखादी कार्य करायचे ठरवले तर ते तडीस नेतात त्यासाठी अथक परिश्रम देखील घेतात तसेच रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे.या महायज्ञात सर्व शिक्षक बंधू भगिनी व विविध सामाजिक संस्थेतील सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या शिक्षक परिषदेच्या हातातून राष्ट्रहिताचे असे कार्य अविरतपणे घडत राहो असे सांगितले.डॉ.हिना गावित यांनी रक्तदानाचे महत्त्व व त्याचे फायदे सांगून आदिवासीबहुल जिल्हा असलेला नंदुरबार यामध्ये असणाऱ्या सिकलसेल या आजाराचे गांभीर्य लक्षात घेता असे अभिनव उपक्रम होणे गरजेचे आहे व त्या अनुषंगाने शिक्षक परिषदेने हाती घेतलेला हा उपक्रम यापुढेही अधिक वृद्धिंगत व्हावा व राष्ट्रीयत्वाची व समाजाचे कार्य आपल्या हातून घडो अशा सदिच्छा दिल्या. शिबीरात १०५ रक्तदात्यांनी भेट दिली त्या पैकी आरोग्य दृष्टया पात्र ६२ रक्तदात्यांनी नंदुरबारमध्ये प्रत्यक्षात रक्तदान केले तर शहादा तालुक्यात ५५,अक्कलकुवा तालुक्यात ५२,तळोदा तालुक्यात २८,नवापूर तालुक्यात २४ सह जिल्हा भरातून २३१ रक्तदात्यांच्या रक्तदान केले.पंचायत समिती नंदुरबारच्या सहाय्यक गटविकास अधिकारी सुवर्णा पवार,लोकमतचे मनोज शेलार,गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे,बीजेपी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनीदेखील या रक्तदान शिबिरास भेट दिली.आरोग्य विभागाच्या डॉ.वाडीकर आणि रक्तदात्यांचे आरोग्य तपासणी करून तंत्रसहायक सोनवणे यांनी रक्त संग्रहाचे काम केलरक्तदान शिबिराच्या यशस्वितेकरिता विभाग कार्यवाह रामकृष्ण बागल, आबा बच्छाव जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी,जिल्हा कार्यवाह किरण घरटे,जिल्हा कोषाध्यक्ष शरद घुगे,जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश मोरे,संघटनमंत्री प्रकाश बोरसे,जिल्हा उपाध्यक्ष गोकुळदास बेडसे,जिल्हा संपर्क प्रमुख संदीप काकुस्ते,संदीप खेडकर,कार्यालय मंत्री जगदीश पाटील,प्रसिद्धीप्रमुख चौधरी,तालुकाध्यक्ष अनिल देवरे,तालुका कार्यवाह भिकन पिंजारी, महिला आघाडीच्या चेतना चावडा,मीनल लोखंडे,माला बागल,संगमित्रा खैरनार,चेतना तावडे,शुभांगी सोनवणे,तालुका कार्यकारिणीचे बालाजी लोंढे,राजेंद्र चौधरी,भिकन पिंजारी,पवन निकम,आदीनी परिश्रम घेतले.