नवापूर l प्रतिनिधी
अहमदाबादहुन जालना कडे जात असलेल्या श्रीहरी ट्रॅव्हल्स चा नेहरू गार्डन चा नजीक मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अपघात झाला या अपघातात बावीस प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनाथ ट्रॅव्हल्स नवापूर शहरातील नेहरू गार्डन च्या वळणावर समोरून भरधाव वेगाने ट्रक येत असल्याने लक्झरी चालकाने ट्रॅव्हल्स रोडच्या बाजूला घेतली असता सिमेंटच्या डिव्हायडर वर ठोकल्या गेल्याने ट्रॅव्हल्स पलटी झाली.
या अपघातात एकूण बावीस प्रवासी बसमध्ये दाबले गेले या दरम्यान बस मधील महिला बालकांनी रात्री किंकाळ्या मारत आक्रोश केला. नवापूर शहरातील नागरिकांनी व हॉटेल व्यवसायिकांनी ट्रॅव्हल्स मध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले यादरम्यान बसच्या खिडकीची काचे तसेच बसचे पत्रा बाजूला करून सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले.या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. 20 ते 22 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.6 जखमी प्रवाशांना उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघात दरम्यान इतर दोन वाहनांचा देखील अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्सचा मागे उभ्या असलेल्या टेम्पोला दुसरी ट्रॅव्हल्स बस ठोकली गेली. यात बसच्या काचा फुटल्याने रोडवर काचांचा खच पडला होता.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी प्रवाशांना बसमधून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले तसेच उर्वरित प्रवाशांना नवापुर आगारातून औरंगाबादसाठी बस पाठवून पर्यायी व्यवस्था केली. नवापूर शहरातील नेहरू गार्डन आज एक वळणावर नेहमी अपघात होत आहे या ठिकाणी ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. अनेक अपघात होऊन देखील संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही त्यामुळे नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे. या संदर्भात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.