नंदुबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील पाडळदा रस्त्यावर शिकंजीची लॉरी लावण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एकास खुरपाने मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील पाडळदा रस्त्यावरील तिखोरा पुलाजवळ संदिप लक्ष्मण अहिरे व भोईसंग काशिनाथ ठाकरे यांच्यात शिकंजीची लॉरी लावण्याच्या कारणावरुन वाद झाला. या वादातून संदिप अहिरे यांना भोईसंग काशिनाथ ठाकरे याने शिकंजी बनविण्याच्या स्टिलच्या खुरपाने कपाळावर मारुन दुखापत केली. याबाबत संदिप अहिरे यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात भोईसंग ठाकरे, आकाश भोईसंग ठाकरे दोघे रा.मिरानगर, शहादा व दत्ता मराठे रा.लोणखेडा ता.शहादा यांच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पाडवी करीत आहेत.








