नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड मुंबई, नंदुरबार जिल्हा संस्था आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने राजे शिवाजी विद्यालय नंदुरबार येथे स्काऊट मास्टर प्रगत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्याभरातून विविध शाळातून 28 स्काऊट शिक्षक शिबिरास उपस्थित होते.
भारत स्काऊट आणि गाईड दिल्ली आणि राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र पचमढी यांनी नेमून दिलेल्या अभ्यासक्रमानुसार प्रात्यक्षिक आणि लेखी अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला.विविध गाठी , बांधण्या,अंदाज,नकाशा वाचन आणि नकाशा काढणे , प्रथमोपचार , पायोनियरिंग प्रकल्प , तंबू निरीक्षण, झेंडावंदन , विविध खेळ , हाइक या सारख्या अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराचे संचालन शिबिर प्रमुख हेमंत पाटील लीडर ट्रेनर यांनी केले.तर शिबीर सहाय्यक म्हणून हिरालाल पाटील सहाय्यक लीडर ट्रेनर , अशोक पाटील प्री ए एल टी, संकेत माळी प्री ए एल टी,ज्ञानेश्वर सावंत प्री ए एल टी यांनी काम पाहिले.
जिल्हा संघटन आयुक्त कविता वाघ यांनी मार्गदर्शन केले.
नंदुरबार नगर परिषदेच्या अध्यक्षा तथा जिल्हा स्काऊट गाईड संस्थेच्या गाईड आयुक्त सौ.रत्नाताई चंद्रकांत रघुवंशी , जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक सतीश चौधरी , जिल्हा संस्थेचे अध्यक्ष यशवंत पाटील , जिल्हा मुख्यालय आयुक्त पुष्पेंद्र रघुवंशी , राजे शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांनी शिबिराला सदिच्छा भेट देवून सुयोग्य मार्गदर्शन केले.योसेफ गावित यांनी सहकार्य केले.