नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील भवानी चौकात डीजे वाजवू दिला नाही व पोलिसांनी राम नवमीची मिरवणूक काढू दिली नाही याचे वाईट वाटून दगडफेक केल्याप्रकरणी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा शहरातील भवानी चौकात डीजे वाजवू दिला नाही व पोलिसांनी राम नवमीची मिरवणूक काढू दिली नाही याचे वाईट वाटून रस्त्यावर जमाव जमवून दगडफेक करीत जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत पोना. किरण रोहिदास पावरा यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात गणेश अल्केश महाजन, गोपाल सोनार, गौरव मराठे, आदित्य डोडवे, विक्की भोई, दीपक भोई, सागर भोई, रोहित तिरमले, विशाल भोई, सचिन मराठे, हर्षल भोई, किशोर कोळी सर्व रा.भवानी चौक, शहादा यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३३६, १४३, १४७, १४९ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे करीत आहेत.