नंदुरबार ! प्रतिनिधी
परशुराम संस्कार सेवा संघाच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप व दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
शहरातील गणेशनगर मधील समाज भवनात हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर पत्रकार राकेश कलाल, रवींद्र चव्हाण, परशुराम संस्कार सेवा संघाचे कार्यकारी अध्यक्ष तुषार उदारे, सचिव कमलेश पंडित, ग्रामीण अध्यक्ष योगेश कुलकर्णी, विवेक कुलकर्णी, संघटक अवधेश पंड्या,भूषण भट,संतोष देवळालीकर, खजिनदार मयूर कुलकर्णी, सहखजिनदार सुव्रत वाडेकर,आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप व गौरव करण्यात आला. समाजातील आपण काही देणे लागतो या भावनेतून परशुराम संस्कार सेवा संघाचे अध्यक्ष अरविंद विंगळे यांच्या पुढाकाराने दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव आणि गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी गणेशनगर परिसरातील नागरिक मोहन सोनार,राजेंद्र मिस्त्री,सौ भारती सूर्यवंशी, सौ. जोती शिरसाठ, सौ. कल्पना शिरसाठ,सौ. कल्याणी चौधरी, सौ. पूनम पिंगळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन परशुराम संस्कार सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद विंगळे, सौ. आश्विनी विंगळे यांनी केले होते.