Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोरोना शहीद आरोग्य कर्मचार्‍यास 50 लाखाचा विमा मंजूर

team by team
August 1, 2021
in सामाजिक
0

नंदुरबार ! प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना शहिद स्व.राजेंद्र माळी यांच्या वारसांना विमा योजनेचा लाभ मिळाला असून 50 लाख रुपये खात्यावर जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती जि.प.आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभयसिंग चित्ते यांनी दिली.
कोविड काळात नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्‍यांनी कोरोनाला हद्दपार  करण्यासाठी जीवाची बाजी लावली आहे. त्यातच कोरोना कामे करीत असतांना प्रा.आ.केंद्र खापर मधील कोराई उपकेंद्राचे आरोग्य सेवक राजेंद्र सुकलाल माळी यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. कोरोनामुळे आरोग्य कर्मचारी दगावल्याची नंदुरबार जिल्ह्यातील ही पहिलीच घटना होती. शासनाने कोरोना योध्दांसाठी पंतप्रधान विमा सुरक्षा कवच योजना सुरु केली.  यासाठी  मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने सर्व कागदपत्र एकत्र करुन प्रस्ताव सादर केला. यावर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गावडे यांनी तातडीने निर्णय घेवून पुढील मंजूरीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजूरी मिळाली असून स्व.माळी यांच्या पत्नीच्या बँक खात्यावर 50 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते विम्याचे कागदपत्र माळी कुटूबियांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अभयसिंग चित्ते, भूपेंद्रकुमार चौधरी, रियाज सैय्यद, सागर शर्मा, संजय राजपूत उपस्थित होते.
विमा मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचे संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत. विमाप्रस्ताव तयार करण्यासाठी संघटनेने परिश्रम घेतल्याने माळी कुटूंबियांनी जि.प.आरोग्य सेवा कर्मचारी संघटना व पदाधिकारी यांचे आभार मानण्यात आले आहेत. संघटनेच्या वतीने आतापावेतो दोन कुटूबांना विम्याचा लाभ मिळवून दिल्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया जि.प.आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभयसिंग चित्ते यांनी व्यक्त केली आहे. स्व.माळी यांच्या वारसांना प्राधान्याने अनुकंपा तत्वावर शासकिय सेवेत सामावून घ्यावे अशी आग्रही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

 

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय लोकअदालतीत १ हजार ५२० प्रकरणे निकाली,४ कोटी ३८ लाखाची नुकसान भरपाई

Next Post

परशुराम संस्कार सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Next Post
परशुराम संस्कार सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

परशुराम संस्कार सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add