Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखेर त्या बछडयास गुजरात वनविभागाने घेतले ताब्यात

team by team
April 13, 2022
in कृषी
0
अखेर त्या बछडयास गुजरात वनविभागाने घेतले ताब्यात

तळोदा l प्रतिनिधी
तालुक्यातील बहुरूपा शिवारात १० दिवसाचे बिबट्याचे बछडे शुक्रवारी आढळले होते. दरम्यान वनविभागाने त्यास ट्रॅप कॅमेरे लावून त्याच शेतात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ५ दिवस उलटूनही मादी बछडयास घेवून न गेल्यामुळे अखेर त्या बछडयास गुजरात वनविभागाने ताब्यात घेतले असून त्यास सुरत येथील उद्यानात ठेवले जाणार असल्याची माहिती यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिले.
तळोदा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेला गुजरात राज्यातील बहुरुपा येथील शेत शिवारात गिरधर पटेल यांच्या शेतात शुक्रवारी भर दिवसा दुपारी ३ वाजेच्या सुमारास बिबट्याचे १० दिवसाचे बछडे मुक्त संचार करताना शेतमालक याना दिसून आले होते. त्यांनी याबाबतची माहिती लागलीच वनविभागाला कळविली होती. गुजरात व तळोदा येथील वनविभागाचे कर्मचारी व मानव वनजिव रक्षकचे सागर निकुंभ दिनेश कोळी, हेमंत चौधरी, या कर्मचाऱ्यानी परिस्थीती जाणून घेतली होती. त्या अनुषंगाने रात्रीची सुमारास मादी बिबट येवून त्या बछड्यास घेवून जाईल या आशेवर गुजरात व महाराष्ट्राचे वनविभागाने सयुक्तिकपणे ट्रॅप कॅमेरे लावून रात्री गस्त घालून बछड्यास सुरक्षितपणे मादीला देण्यासाठी मागील चार दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र सदर पिलास मादी बिबट घेऊन न गेल्यामुळे मोठा प्रश्न वन विभागा समोर उभा राहिला.
याबाबत अधिक माहिती घेतली असता गुजरात वन विभागा च्या माध्यमातून सदर बिबट्या पिल्लू ची नियमितपणे वैद्यकीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी सोनगड यांच्यामार्फत करण्यात येत असून सदर बिबट्याचे पिल्लू सुदुरुढ असल्याचे समजते मात्र पुढील आणखी एक ते दोन दिवस बिबट्याचे पिल्लू आईजवळ सुरक्षित कसे जाईल यासाठी गुजरात वन विभाग महाराष्ट्र वन विभागाच्या मदतीने प्रयत्न होणार आहेत. तसे न झाल्यास सदर बिबट्या पिलास सुरत या ठिकाणी पार्कमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात येण्याची माहिती गुजरात वनविभागाकडून देण्यात आली.

गुजरात व महाराष्ट्र सीमा लगत असल्याने नेमका बिबट्या कुठला ?
तळोदा वन क्षेत्राला लागून गुजरात वनक्षेत्र हद्द असल्याने अनेकदा हा प्रश्न गुंतागुंतीच्या होत असतो दोन वर्षापूर्वी धानोरा या ठिकाणी गुजरात हद्दीत अशाच पद्धतीने बिबट्याचे दोन पिलं आढळून आली होती याबाबत अनेक प्रयत्न करून देखील मादी बचड्यास घेवून न गेल्यामुळे तिसऱ्या दिवशी अखेर मादी या दोघा पिल्लांना घेऊन जाण्यास यशस्वी ठरली होती. यावेळी देखील गुजरात वन विभागाने बिबट्याच्या पिल्लास आपल्या आई पर्यंत सुरक्षित पोचवण्यात महाराष्ट्र वन विभागाच्या मदतीने यश मिळवले होते. तळोदा शहर हे गुजरात हद्दीलगत असून वनक्षेत्र हेदेखील गुजरात हद्दीला लागून आहे. शहराच्या उत्तरेला व दक्षिणेला गुजरात राज्याच्या सीमा असून तळोद्यातील शेतकऱ्यांची शेती ही गुजरात हद्दीत आहे. वेळोवेळी व तत्सम पशु या भागात गुजरात व महाराष्ट्राचां सिमे लगत फिरत असतात अनेकदा त्यांच्यामध्ये या विषयावरून शाब्दिक वाद देखील होतात. मात्र यावेळी अधिकाऱ्यांच्या समजदार पणा मुळे बिबट्याच्या पिल्याला वाचवण्यासाठी गुजरात व महाराष्ट्र वन विभाग संयुक्तपणे कारवाई करत असताना सदर बछड्यास मादी भेटते का ? याकडे वन्यजीवप्रेमींचं लक्ष लागून आहे. वन्य जीव प्राण्यांबाबत कडक नियमावली असल्याने वन्य जीव आढळून आल्यास त्याची नेमकं स्थान कुठ आहे याची माहिती द्यावी लागते.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा आगारात इंधन बचत कार्यक्रम उत्साहात

Next Post

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विखरण येथील युवा कवी रामकृष्ण पाटील सादर करणार कविता

Next Post
95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विखरण येथील युवा कवी रामकृष्ण पाटील सादर करणार कविता

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विखरण येथील युवा कवी रामकृष्ण पाटील सादर करणार कविता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add