Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाळूचे लिलाव सुरू करण्याचे महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश

team by team
April 13, 2022
in राज्य
0
वाळूचे लिलाव सुरू करण्याचे महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश

मुंबई l
राज्य शासनाने वाळू उत्खनन करण्याबाबत नवीन सुधारित धोरण आणले आहे. या धोरणानुसार सर्व निकष पूर्ण असलेल्या वाळू गटांचे लिलाव सुरु करावे तसेच महसूल विभागाशी संबंधित कामांना गती द्यावी, असे निर्देश महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात श्री.थोरात यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाशी संबंधित विविध विषयांची आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, जमाबंदी आयुक्त, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद विभागीय आयुक्त, नोंदणी महानिरिक्षक आणि महसूल विभागाचे सहसचिव उपस्थित होते.
मंत्री श्री.थोरात म्हणाले, राज्यातील अनेक भागात वाळू अभावी बांधकामे प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नवीन सुधारित धोरण राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या धोरणानुसार राज्यातील वाळू, दगड गटांचे लिलाव सुरु करण्याची गरज आहे. सर्व निकषांची पूर्तता असलेल्या ठिकाणी लिलाव प्रक्रिया तातडीने सुरु करुन नागरिकांना वाळू उपलब्ध करुन द्यावी. जेणेकरुन नागरिकांना दिलासा मिळेल व वाळूचोरीसारख्या प्रकारांना आळा बसेल. लिलाव प्रक्रिया वेळेत पूर्ण होतील यासाठी देखरेख करावी. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणातील प्रकरणांविषयी राज्य शासनाने प्रभावी आणि मजबुतीने भूमिका मांडण्याचे निर्देशही श्री.थोरात यांनी अधिकाऱ्यांना दिले.
ई पीक पाहणी संदर्भात माहिती घेताना येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांची अचूक नोंद करण्यासंदर्भात राज्यव्यापी ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी होईल याकडे प्रशासनाने कटाक्षाने लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना श्री.थोरात यांनी यावेळी केल्या.
हरकत नसलेले प्रलंबित नोंदणीकृत फेरफारची प्रकरणे ठराविक कालावधीत निकाली काढावीत. सातबारा संगणकीकरण बहुतांशी पूर्ण झाले असले तरी ही प्रणाली टिकविण्यासाठी नवनवीन संशोधन करुन या प्रणालीमध्ये वेळोवेळी बदल किंवा सुधारणा करण्यात यावी. नवीन उपविभागीय अधिकारी कार्यालय सुरु करणे. क्षेत्रिय स्तरावरील महसूल कार्यालयांमध्ये स्वच्छतेच्या सुविधा, दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी रॅम्प आणि लिफ्टची सुविधा उपलब्ध करण्याबाबत विभागाने विशेष मोहीम राबविण्याचे निर्देशही महसूल मंत्री श्री.थोरात यांनी दिले.
महसूल विभागाच्या महत्त्वाकांक्षी धोरण आणि निर्णयांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विभागाने आराखडा तयार करावा, अशा सूचनादेखील श्री.थोरात यांनी केल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा पोलिस निरीक्षक यांना निलंबित करा: आमदार राजेश पाडवी यांची मागणी, गृह मंत्री व विरोधी पक्षनेते यांना दिले निवेदन

Next Post

शहादा येथे 19 ते 23 एप्रिल दरम्यान युवारंग चे आयोजन, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 77 महाविद्यालयांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add